Farmers Protest
sakal
नाशिक: आदिवासी भागातील रखडलेले वनहक्क पट्ट्याचे दावे, पाणीटंचाई, शेतीच्या नुकसानीसह विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय किसान सभेने जिल्ह्याभरात आंदोलन पुकारले आहे. याबाबत माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी (ता. १९) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत चर्चा केली, पण चर्चेअंती ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान देवळा, नांदगाव, निफाड, पेठ आदी ठिकाणी आंदोलने झाली.