esakal | "कृषिमंत्री साहेब उत्तर द्या..पेरणीची वेळ गेल्यावर बियाणे देणार का?" शेतकऱ्यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

dada-bhuse farmers.jpg

उशिरा पेरलेल्या बियाण्यांतून उत्पादन मिळेल का? वेळेवर पाऊस न झाल्यास ते टिकेल का? असे प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असताना अद्यापही निकृष्ट बियाण्यांच्या बदल्यात अनेक तक्रारदार शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेली नाहीत. 

"कृषिमंत्री साहेब उत्तर द्या..पेरणीची वेळ गेल्यावर बियाणे देणार का?" शेतकऱ्यांचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / पिंपळगावं बसवंत : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे न उगलवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. बियाण्यांचे वाटप करणाऱ्यांमध्ये महाबीजसह खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यात हजारो तक्रारी कृषी विभागाकडे आल्यानंतर शासनाने महाबीज कंपनीला बियाणे बदलून देण्याचे निर्देश दिले. मात्र, पेरणीची वेळ हातून जात असताना शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे न मिळाल्याने पेरणीची वेळ निघून गेल्यावर बियाणे देणार का? असा सवाल दुबार पेरणीची वेळ आलेले शेतकरी विचारत आहेत. अनेकांनी मोफत बियाणे मिळण्याची वाट न पाहता स्वखर्चातून दुबार पेरणी केली आहे. 

उशिरा पेरलेल्या बियाण्यांतून उत्पादन मिळेल का?
जिल्ह्यात अकराशे शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणे उगवली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित कंपन्यांवर कारवाईचा फास आवळला आहे. मोजक्‍याच शेतकऱ्यांना कंपन्यांनी बियाणे बदलून दिले किंवा नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उशिरा पेरलेल्या बियाण्यांतून उत्पादन मिळेल का? वेळेवर पाऊस न झाल्यास ते टिकेल का? असे प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असताना अद्यापही निकृष्ट बियाण्यांच्या बदल्यात अनेक तक्रारदार शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळालेली नाहीत. 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

शेतकऱ्यांच्या हातातून पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्‍यता
कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाबीजच्या व्यवस्थापकांना अहवालाची वाट न पाहता तातडीने बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. मात्र कृषी विभागाकडून तक्रारीच्या पडताळणीसाठी होत असलेला विलंब आणि कृषीशास्त्रज्ञ, अधिकारी यांच्यात समितीचा अहवाल या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हातातून पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बोगस बियाणे निघालेल्या कंपन्यांवर कारवाई व्हायची तेव्हा होईल. पण शेतकऱ्यांची पेरणीची वेळ निघून जाण्यापूर्वी बियाणे बदलून देण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

खते व मंजुरीची रक्कमही द्यावी.
शेतकऱ्यांचा दोष नसताना कंपन्यांच्या एकतर्फी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फक्त बियाण्यांची नुकसानभरपाई न देता खते व मंजुरीची रक्कमही द्यावी. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तशी मागणी केली आहे. - संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) 

loading image
go to top