Fake Pesticides : बनावट कीटकनाशकांनी जिल्ह्यात शेतकरी हैराण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Pesticides News

Fake Pesticides : बनावट कीटकनाशकांनी जिल्ह्यात शेतकरी हैराण!

नाशिक : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अधिकृत कीटकनाशके विक्रेत्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट कीटकनाशके उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आहेत. (Farmers shocked by fake pesticides in district Nashik News)

हेही वाचा: Nashik : महिन्याभरात Metro Neoचा नारळ फुटणार; NMC आयुक्तांची पालकमंत्र्यांना माहिती

सद्यःस्थितीत टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, भोपळा, वेलवर्गीय पिके आणि भाजीपाला लागवड द्राक्ष छाटणी करण्यात येत आहे. द्राक्ष पीक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे, यावर जर एखाद्या बनावट औषधाचा स्प्रे झाला, तर शंभर टक्के बाग उद्ध्वस्त होण्याची भीती असते. म्हणून या पिकांसाठी शेतकरी खते, कीटकनाशके, खरेदी करत असतो, मात्र बाजारात बनावट कीटक नाशकांचा सुळसुळाट वाढला आहे.

गेल्या काही दिवसापासून नाशिक कृषी विभागाने केलेल्या कारवाईत बनावट कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांना बनावट औषधाची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि बनावट कीटकनाशकापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध करावे, अशी मागणी होत आहे.

"बाजारात बनावट खत औषधांबरोबरच बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे बळीराजावर आर्थिक बोजा पडत आहे. अशावेळी कृषी विभागाने बनावट औषधे खतविक्री करणाऱ्यांना रोखण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी."

- सुदाम हळदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

हेही वाचा: Nashik : पवन नगरला शॉर्ट सर्किट; लाखोंचं नुकसान