Neo Metro  News
Neo Metro Newsesakal

Nashik : महिन्याभरात Metro Neoचा नारळ फुटणार; NMC आयुक्तांची पालकमंत्र्यांना माहिती

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मेट्रो निओचा नारळ महिनाभरात फुटेल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना दिली. पालकमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहराशी संबंधित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती.

या वेळी विविध प्रलंबित प्रकल्पात संबंधात पालकमंत्र्यांनी माहिती घेतली यावेळी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेट्रो निओ प्रकल्पासंदर्भात विचारणा करण्यात आली. (Metro Neo begin in month Information of NMC Commissioner to Guardian Minister Nashik Latest Marathi News)

Neo Metro  News
No Objection Certificate : ना हरकत दाखल्यापोटी सिडकोकरांडून वसुली

निओ मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदरचा प्रस्ताव सादर केला जाणार असून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी पालकमंत्र्यांना दिली. त्यामुळे येत्या महिन्याभरात मेट्रोचा नारळ फुटून नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित होते.

औरंगाबाद महामार्गावर उड्डाणपूल, पेठ रोड होणार काँक्रिटचा

पंचवटी विभागातील पेठ रोड पावसाळ्यात अक्षरशः वाहून गेला असून, चाळण झालेल्या या रस्त्यावर वाहने चालविणे मुश्कील झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी महापालिका, नियोजन समितीच्या निधीमधून रस्त्याची डागडुजी व काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली.

औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौकात झालेल्या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतुकीचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याची मागणी आमदार ढिकले यांनी केली. उड्डाणपूल उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Neo Metro  News
Graduate Constituency : नाशिकच्या मैदानात विखे- थोरातांची पारंपरिक लढत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com