Nashik News: शेतकरी पुत्रांचा सोशल मीडियावर कोरडा दुष्काळ ट्रेंड!

Drought
Drought esakal

Nashik News : निसर्गाचा लहरीपणा काय असतो, याचा प्रत्यय यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलाय. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने खरीप पेरण्याच होतील की नाही, याबाबत साशंकता होती.

जुलैमध्ये शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली अन् अशी काय पावसाला सुरवात झाली. त्यामुळे जमिनीत गाढलेले बियाणे उगवणार की नाही, अशी अवस्था होती.

आता तर पिके फुल लागण्याच्या अवस्थेत असताना, पुन्हा पावसाने ओढ दिली आहे. याचा परिणाम थेट उत्पादनावर होत असल्याने राज्यातील शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर हॅशटॅग कोरडा दुष्काळ वापरत शेतकऱ्यांची अवस्था विशद केली. (Farmers son dry drought trend on social media Nashik News)

शेतकरी जगणार कसा?

गेल्या अनेक वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञानातून शेती प्रगत होत असली, तरी उत्पादन खर्चही त्या मानाने वाढला आहे. त्यात निसर्गाचे दृष्टचक्र घात करत असल्याने शेती न परवडणारी झाली आहे. उत्पन्न वाढले, उत्पादन खर्चही वाढला.

मात्र, पिकांचे भाव स्थिर राहत असल्याने शेती करण्यापेक्षा मजुरी पुरली, असे काहीशे चित्र तयार झाले आहे. यामुळे कृषीप्रधान देश संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. कधी अवकाळी, तर कधी अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला जातोय.

शेतकऱ्यांच्या पोरांनी आता फक्त ‘औता’वरच नव्हे, तर व्यवस्थेच्या 'छाताडा'वरही पाय ठेवून मदत घ्यावी लागेल !

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Drought
Eknath Shinde Group: महिलांसह तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश! दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक

सध्या हिंदू या मुस्लिम खत्रे में नही, सोयाबीन, तूर, मूग, उडीद और शेतकरी खत्रे में है !! सत्तेसाठी लाचारी करणाऱ्यांनो कोरडा दुष्काळ बघा. यासह इतरही अधिक पोस्ट वाचायला मिळाल्यात.

"खरीप गेल्यात जमा.. रब्बीची हमी नाही.. शेतकऱ्यांना वाली कोण..?"-अपर्णा पवार-भोईर

"शासन आपल्या दारी म्हणता अन्‌ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता. वारे सरकार..."

-शैलेश चंदनशिवे

"गेल्या ३० ते ३५ दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकऱ्यांची पिके हातातून गेली आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याच्या जागेवर राज्यकर्ते ‘शासन आपल्या दारी’ सारखा कार्यक्रमात व्यस्त आहेत. अरे शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा."

-संग्राम लोणीकर

Drought
Nashik News: निफाड नगरपंचायतीसाठी 23 कोटी मंजूर! वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहराचा होणार कायापालट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com