नामपूर- शासनाच्या कृषीविरोधी धोरणांमुळे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत असल्याने देशाचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यावर्षीही राज्यात दरदिवशी ८ शेतकरी आत्महत्या विदारक चित्र असून किसानपुत्र आंदोलन, शेतकरी संघटनेतर्फे येत्या बुधवारी (ता. १९) सटाणा येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन होणार आहे. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी दिली.