कसबे सुकेणे- जिल्हा सहकारी बँकेच्या जाचक १०० दिवसांच्या वसुलीविरोधात तसेच जप्ती, लिलाव, १००/८५ अंतर्गत ७/१२ वरती नावे लावणे याविरोधात कायदेशीर लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे शरद जोशीप्रणीत जिल्हा शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात सोमवारी केले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.