Nashik News : Geranium शेतीचा सुगंध दरवळणार; दिंडोरी तालुक्यात बळिराजांचा अनोखा प्रयोग

farm of geranium
farm of geraniumesakal

लखमापूर (जि. नाशिक) : द्राक्षपंढरी म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या दिंडोरी तालुक्यात नवनवीन प्रयोग आता नवीन राहिले नाही. ड्रॅगनफ्रूटनंतर आता ‘जिरॅनियम’ कांची लागवड करण्याचा नवीन प्रयोग कोराटे येथील राहुल दौलत कदम यांनी एक एकरात प्रयोग केल्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जिरॅनियम वनस्पतींच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकले जाते. तसेच, रोपे तयार करून लागवडीसाठी विक्री करण्यात येते. (farmers unique experiment of Geranium farming in akrale Dindori taluka Nashik News)

सुगंधी वनस्पती म्हणजे जिरॅनियम शेतीचा प्रयोग आहे. श्री. कदम यांनी तीन फूट बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून एकरी दहा हजार रोपे लागली आहे. एका रोपांची किंमत साधरणपणे सहा रुपयाला आहे. जिरॅनियमच्या झुडपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यात साधारणतः अडीच ते तीन फूट उंचीपर्यंत वाढ होऊन पाल्याची पहिली कापणी केली जाते. एका एकरांत एका कापणीपासून ६ ते ७ टनांपर्यंत पाला व त्या पाल्यांपासून ६ किलो सुगंधी तेल मिळू शकते. लागवड केल्यापासून ४ वर्षापर्यंत उत्पन्न घेता येते.

उत्पन्न कसे मिळते

जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून ३० ते ४० किलो सुगंधी तेल मिळते. जिरॅनियमच्या तेलाला एका किलोला १२ ते १५ हजार रुपये भाव मिळतो. यासाठी विविध कंपन्यांशी याबाबत विक्री करार करण्यात येतो.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

farm of geranium
Dhule News : अखेर भूमिगत गटारीचे काम सुरू

एकरी १५ किलो तेलाचे उत्पादन

प्रक्रिया करून जिरॅनियम या वनस्पतींच्या पानांपासून तेल काढले जाते. जिरॅनियमच्या तेलाला प्रति किलो १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो. एकरी १० ते १५ किलो तेलाचे उत्पन्न मिळते. यातून शेतकरी वर्गाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळते.

पिकापासून ऑइल निर्मिती

जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान ३ ते ४ वर्ष उत्पादन मिळते. एका एकरांमध्ये १० हजार रोप लागतात. हे पीक एका वर्षात ३ ते ४ वेळा कापणी, लागवड खर्च ७० ते ८० हजार, इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी, रोगांचा प्रादुर्भाव अल्प, पिकांपासून ऑइल निर्मिती केली जाते.

तसेच, कापणीनंतर उरलेला पालापाचोळा यापासून खत निर्मिती होते. या वनस्पतीला भारतातून विविध ठिकाणांहून मागणी आहे. हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिकसाठी याचा वापर होतो. फरफ्यूममध्ये जी नैसर्गिकता लागते ती यामधूच मिळते. त्यामुळे जिरॅनियम तेलाचा सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर आदींसाठी मोठा उपयोग केला जातो. असे राहुल कदम यांनी नमूद केले.

farm of geranium
Nashik News : अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिस पाटीलांची मदत : सिन्नर तहसीलदारांचा आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com