Dhule News : अखेर भूमिगत गटारीचे काम सुरू

Dhule: Work in progress to lay pipeline in front of Santkripa complex in Devpur area under underground sewerage scheme
Dhule: Work in progress to lay pipeline in front of Santkripa complex in Devpur area under underground sewerage schemeesakal

धुळे : शहराच्या देवपूर भागासाठी मंजूर सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाच्या भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजनेचे बंद पडलेले काम अखेर सुरू झाले आहे.

ठेकेदाराचे बिल अडकल्यामुळे साधारण वर्ष-दीड वर्षापासून योजनेचे काम ठप्प होते. आता काम सुरू झाल्यानंतर ते पूर्णत्वास यावे, अशी धुळेकरांची अपेक्षा असणार आहे.

धुळे शहराच्या देवपूर भागासाठी २०१९ मध्ये १३१ कोटी रुपये खर्चाची भूमिगत गटार योजना मंजूर झाली. निविदाप्रक्रियेअंती ही योजना दीडशे कोटींवर गेली. त्यातही नंतर योजनेंतर्गत सुमारे साडेआठ हजार चेंबरची कामे झाली, मात्र या कामांचा योजनेत समावेश नसल्याचे कारण पुढे आले. (Underground sewer work has started Dhule News)

Dhule: Work in progress to lay pipeline in front of Santkripa complex in Devpur area under underground sewerage scheme
Nashik News : आजोबा-वडिलांचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप

मात्र, या चेंबर व आनुषंगिक कामांचे ठेकेदाराने (एन. पी. पटेल ॲन्ड कंपनी) २८ कोटी रुपये बिल काढले. हेच बिल अडकल्याने साधारण वर्षभरापासून योजनेचे काम ठप्प होते. हा वाढीव खर्च धुळे महापालिका करेल, असे शासनाचे म्हणणे होते, तर महापालिकेच्या स्थायी समितीने हे बिल महापालिका अदा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

या वांध्यामुळे मात्र योजनेचे काम पूर्णपणे ठप्प होते. दरम्यान, आता गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून योजनेचे काम सुरू झाल्याचे एमजेपीच्या अभियंत्यांनी सांगितले. देवपूर भागातील गणेशनगर, मुक्ताईनगर, संतकृपा कॉम्प्लेक्स, शारदा नेत्रालयासमोरील रस्ता या भागात सध्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

डीपी रस्त्यांवर पाइपलाइनचे काम बाकी होते, हे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. साधारण पाच किलोमीटर लांबीचे हे काम आहे. योजनेंतर्गत १४७ पैकी मुख्य पाइपलाइनसह सुमारे २० किलोमीटर पाइपलाइनचे काम बाकी असल्याचे अधिकारी म्हणतात. योजनेंतर्गत ४० एमएलडी व १७ एमएलडी क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे कामही सुरू आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Dhule: Work in progress to lay pipeline in front of Santkripa complex in Devpur area under underground sewerage scheme
Jalgaon News : 12 बाजार समित्यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा

ही कामे साधारण ८५ टक्के पूर्ण झाली आहेत. योजनेचे काम सुरू झाले असले तरी ठेकेदाराच्या बिलाचा प्रश्‍न रखडलेला असल्याची माहिती मिळाली. मात्र, ठेकेदाराला बिल अदा होण्याचे आश्‍वासन शासनस्तरावरून मिळाल्याने व शासनाच्या आदेशानुसार ठेकेदाराने योजनेचे काम सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत कोणताही अडथळा येऊ नये, अशी धुळेकरांची अपेक्षा असणार आहे.

रस्ते कामांतील अडथळा दूर

ज्या भागात सध्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाले आहे, त्या भागात काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामेही मंजूर आहेत. यात नकाणे रोड ते संतकृपा कॉम्प्लेक्सदरम्यानच्या रस्त्याचाही समावेश आहे. या रस्त्याची सद्यःस्थितीत दुर्दशा झाली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Dhule: Work in progress to lay pipeline in front of Santkripa complex in Devpur area under underground sewerage scheme
Nashik News: मुख्यमंत्रीसाहेब सातबाऱ्यावर नोंदी पैशांशिवाय होतच नाही! जिल्ह्यातून तक्रारींचा पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com