रोहित्रासाठी वीज कंपनीच्या टोलवाटोलवीला शेतकरी त्रस्त; आंदोलनाचा इशारा

Electric Transfrormer
Electric Transfrormeresakal

अंबासन (जि. नाशिक ) : करंजाड (ता. बागलाण) येथील भुयाणे शिवारातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या (MSEDCL) गलथान कारभारामुळे त्रस्त असून, या परिसरात एकाच रोहित्रावर २६ शेतकऱ्यांची शेतीचे वीजपंप असल्याने वारंवार रोहित्र (Transformer) जळण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुय्यम रोहित्राची मागणी करीत आहेत. मात्र, वीज वितरण कंपनी टोलवाटोलवीची उत्तर देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Electric Transfrormer
नाशिक : इंधनाच्या दरवाढीने उत्पादन खर्चात वाढ; शेतकरी हैराण

तब्बल २६ वीजपंपाचे कनेक्शन

भुयाणे शिवारातील रोहित्र क्रमांक एकवर तब्बल २६ शेतीच्या वीजपंपाचे कनेक्शन आहे. यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शिवारात दुय्यम रोहित्र बसविण्यासाठी २ जानेवारी २०२० पासून पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, दुय्यम रोहित्र बसविण्यासाठी तीन नवीन वीजपंप कनेक्शन आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी तीन नवीन कनेक्शनसाठी ग्राहक दिले. मात्र, आजतागायत दुय्यम रोहित्र बसविण्यात न आल्याने जुन्याच रोहित्रावर तब्बल २६ शेतकरी वीजपंप चालवित आहेत. यामुळे कमीअधिक दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र वारंवार जळत असू,न त्यात फ्यूज कंडक्टर्स व रोहित्रावरील केबल्स धोकादायक झाल्याचे निदर्शनास येत आहेत.

Electric Transfrormer
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू : मनसे

एकाच रोहित्रावर २६ कनेक्शन असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. रोहित्र जळल्यानंतर शेतकऱ्यांना उशिरापर्यंत रोहित्र मिळत नाहीत. मिळाले, तर दुसऱ्याच दिवशी ते रोहित्र जळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. वीज वितरण कंपनीने दखल घेऊन दुय्यम रोहित्र बसवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा घनश्याम आहिरे, जगन्नाथ आहिरे, मधुकर शेवाळे, अनिल शेवाळे, योगेश शेवाळे, शरद देवरे, दादा शेवाळे, महेंद्र आहिरे, मालजी देवरे, सहादू शेवाळे, केवळ आहिरे, साहेबराव आहिरे, शिवाजी आहिरे, दिलीप शेवाळे, बळवंत शेवाळे, पोपट शेवाळे, श्‍यामराव शेवाळे, सयाजी आहिरे, मीराबाई पिंगळे, शिवाजी देवरे, सुधाकर देवरे, मेघराज देवरे, पंडित देवरे, पंडित आहिरे, तानाजी आहिरे, निंबा आहिरे, दौलत आहिरे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com