मुंबई-नाशिक महामार्गावर नांदगावसदो फाट्यावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

Accidental icer and back of container
Accidental icer and back of containeresakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर शनिवार ( ता.२७ रोजी ) पहाटे ४.३० सुमारास एका आयशरने कंटेनरला मागुन जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या झालेल्या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या भिषण झालेल्या अपघातात आयशरमधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकलेले होते.त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. महामार्गावरिल खड्यांमुळे सलग दोन दिवस झालेल्या अपघातात दोघा वाहनचालकांचा निष्पाप बळी गेला असुन टोल कंपनी मात्र टोल वसुलीत मग्न आहे. (Fatal accident at Nagaon chaufuli on Mumbai Nashik highway 1 killed 1 critical nashik latest marathi news)

एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनात नाशिक-मुंबई महामार्गावरिल खड्डे त्वरित बुजवा अन्यथा टोल बंद करु असे सांगितले असतांना सुध्दा टोल कंपनी मृग गिळून आहे.तर मनसेचे जिल्हा उपाध्याक्ष संदीप किर्वे यांनी देखील टोल कंपनीला १० दिवसात खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईलने टोल बंद करु असा इशारा दिला होता.

त्यातील चालक जागीच ठार झाला होता तर गंभीर जखमी क्लीनरला पुढील उपचारासाठी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ( एम. एच २०, ए. एल. ३९७७ ) या क्रमांकाच्या आयशर वाहनाने ( एच. आर. ४६, इ. १७१६ ) या कंटेनरला मागुन धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

या अपघातात चालक संजीव कुमार, वय २२ वर्ष, रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. तर क्लीनर गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Accidental icer and back of container
Nashik : महापालिकेच्या रस्त्यांचे दारिद्र्य उच्च न्यायालयात!

महामार्गावरील या परीसरात खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्यानेच अपघात घडल्याचे बोलले जात आहे. प्रसंगी घोटी महामार्ग पोलीस केंद्रचे पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र गुजरे, जितू पाटोळे, निंबेकर, अनिकेत जाधव, सागर कापसे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस कर्मचारी विजय रुद्रे, ए. एस. बोराडे, देवा वाघ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, रूट पेट्रोलिंग टीम यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.यावेळी काही काळासाठी वाहतुक खोळंबली होती मात्र महामार्ग सुरक्षा पोलीसांनी मदतकार्य करत वाहतुक सुरळीत केली.

Accidental icer and back of container
रणजीपटू सत्‍यजित बच्छावची Dulip Trophyसाठी पश्चिम विभाग संघात निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com