Nashik Accident : नऊ एअर बॅग उघडल्या तरी.. ‘समृद्धी’वरील अपघातात नाशिकचे उद्योजक ठार; भरधाव मर्सिडीज उलटली, पत्नी, मुले गंभीर
Samruddhi Highway Accident : शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटल्यामुळे नाशिकचे उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला आहे. पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सातपूर : शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटून नाशिकचे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला असून, पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (ता. २५) दुपारी हा अपघात घडला. जखमींवर उपचार सुरू आहेत.