esakal | जन्मदात्याकडूनच मुलाचा खून; घटनेमुळे खळबळ

बोलून बातमी शोधा

death
जन्मदात्याकडूनच मुलाचा खून; घटनेमुळे खळबळ
sakal_logo
By
- संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : अनेक वर्षे बेपत्ता असलेल्या बापाने जमिनीसाठी आपल्याच मुलाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना येवला तालुक्यातील कोळम खुर्द येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

येवला तालुक्यातील कोळम खुर्दची घटना

पोलिसपाटील असलेले गणेश भांडे तालुक्यात सोज्वळ व प्रेमळ स्वभावामुळे लोकप्रिय होते. शुक्रवारी (ता. २३) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. जमिनीच्या वादातून कौटुंबिक कलह होताना गणेश याचे वडील संशयित आरोपी विलास भांडे यांनीच हा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गणेश यांच्या आईच्या नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून देण्याची मागणी वडिलांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. याच वादातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.