मुलीच्या तिरंदाजी प्रशिक्षणासाठी वडीलांनी विकली शेती!

Archer Sakshi
Archer Sakshiesakal
Summary

ग्रामीण भागात अद्यापही खेळांबाबत निराशाजनक स्थिती असल्याचा विरोधाभास दिसतो. मात्र, याच निराशाजनक स्थितीवर मात देऊन तरूणीही क्रीडांगणात अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतात, हे साक्षीने दाखवून दिले आहे. मुलीच्या शिक्षणासाठी वडीलांनी चक्क शेती विकून मुलीला तिरंदाजीत प्रोत्साहन देत आहेत.

अंबासन (जि. नाशिक) : ग्रामीण भागात अद्यापही खेळांबाबत निराशाजनक स्थिती असल्याचा विरोधाभास दिसतो. मात्र, याच निराशाजनक स्थितीवर मात देऊन तरूणीही क्रीडांगणात अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतात, हे साक्षीने दाखवून दिले आहे. मुलीच्या शिक्षणासाठी वडीलांनी चक्क शेती विकून मुलीला तिरंदाजीत (archery) प्रोत्साहन देत आहेत. जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नाव उज्ज्वल करणार, अशी आई-वडिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Father sold the farm to train his daughter's archery)

खेळ अतिशय खर्चिक

कांतीलाल नागू आहिरे यांची घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मोलमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह ते करतात. काही वर्षांपूर्वी शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्यात काम केले. त्यानंतर नाशिक येथील खासगी कंपनीत काम करत आहेत. घरगाडा व मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी वाढली. मुली साक्षी व श्यामल या शाळेत हुशार असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई जयश्री व वडील कांतीलाल परिश्रम घेत आहेत. साक्षी धनुष्यबाण खेळात तरबेज असल्याने तिने आजवर अलिबाग, डेक्कन, उस्मानाबाद, वाशिम, पालघर, नागपूर, सांगली व खेलो इंडिया ट्रायल हरियाणा जिल्ह्यात गोल्ड, सिल्व्हर व ब्रांझ अशी पदक पटकावली आहेत. हा खेळ अतिशय खर्चिक असल्याने नाजूक परिस्थितीत खेळातील साहित्य घेणे आहिरे कुटुंबियांना न परवडणारे होते.

Archer Sakshi
विरोधकांनी तिसऱ्या लाटेची तयारी करु नये - संजय राऊत

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार

कांतीलाल यांनी कुठेही न डगमगता साक्षीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित असलेली शेती विकून नियमित सरावासाठी साहित्य खरेदी केले. साक्षीला तिरंदाजीत प्रशिक्षक जिल्हा धनुर्विद्या असोसिएशनच्या श्रीमती मंगल शिंदे, के. पी. लवांड, मोहन कसबे व पोखळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे साक्षीने सांगितले.

मुलीही आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात

मुलींनी गावाचे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्ही धडपड करीत आहोत. घरची परिस्थिती नाजूक असली तरीही मुलींच्या शिक्षणात कुठलीच कमी होऊ नये, यासाठी गावातील शेती विकून सरावासाठी साहित्य घेतले आहे.

- कांतीलाल आहिरे, साक्षीचे व श्यामलचे वडील

मुलांपेक्षा मुलीही आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. दोन्ही मुली कामात हातभार लावून शिक्षण घेत आहेत.

- जयश्री आहिरे, साक्षीचे व श्यामलची आई

(Father sold the farm to train his daughter's archery)

Archer Sakshi
दहावी मुल्‍यमापनासंदर्भात आता हेल्पलाइन द्वारे करा शंकांचे निरसन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com