Corona News : नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती; लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona covid- 19

Corona News : नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती; लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा

देवळा : कोरोनाची (Corona) नवीन लाट येण्याच्या शक्यतेमुळे शहरी व ग्रामीण भागात कोरोनाच्या भीतीचे सावट पसरू लागले आहे. त्यात शासनाकडून मास्क, लस, सुरक्षित अंतर याबाबत सूचना येऊ लागल्याने पुन्हा कोरोनाची परिस्थिती निर्माण होते की काय, या शंकेने जनमाणसात अनामिक भीती दिसू लागली आहे.

हेही वाचा: Corona Update : फक्त चीनच नाही तर 'या' चार देशांमध्ये कोरोना वाढला; धक्कादायक आकडेवारी

चीनसह इतर काही देशांत कोरोना संसर्ग वेगात पसरत असल्याच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक, तसेच सोशल मीडियावर भडक स्वरूपात दाखवल्या जात आहेत. चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीचे भीतिदायक प्रसंग व वर्णन दाखवले जात असल्याने या संसर्गजन्य साथीच्या आठवणी डोळ्यासमोर आणत गप्पांचा केंद्रबिंदू कोरोना ठरू लागला आहे.

भारतात लस दिलेल्यांची संख्या मोठी असल्याने कोरोनाच्या या व्हेरियंटची काळजी करण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे असले, तरी ‘नको तो कोरोना आणि नको ते भीतिदायक वातावरण’ असाच सूर प्रत्येकाकडून व्यक्त होताना दिसत आहे. संसदेत मास्क लावल्याचे चित्रण टीव्हीवर दाखवल्याने पुन्हा मास्क लावण्याची वेळ येणार, पुन्हा घरात बसून राहावे लागणार, कोरोना चाचण्या, औषधोपचार अशा साऱ्याच बाबी पुन्हा अनुभवाव्या लागतील, या भीतीने लहान-मोठे अशा साऱ्यांनाच कोरोनाची भीती वाटू लागली आहे. .

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

लग्न आणि अशाच काही कौटुंबिक कार्यक्रमांच्या नियोजनावरही याचे परिणाम दिसू लागले आहेत. धार्मिक व इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजक-संयोजकही कोरोना काय करतो, याकडे लक्ष देऊन पुढील दिशा ठरवत आहेत.

''कोरोना आल्यावर पुन्हा संचारबंदी, घरातच बसून राहणे, शाळा-महाविद्यालय बंद, कामे बंद, आजारी पडल्यावर होणारी तारांबळ अशा सर्वच गोष्टींमुळे कोरोनाची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु आपण सर्वांनी आपला शारीरिक आणि मानसिक फिटनेस मजबूत ठेवण्याकडे लक्ष देत प्रतिकारशक्ती वाढवावी. कोरोनाची नाहकच भीती बाळगण्याचे कारण नाही.'' -डॉ. प्रशांत निकम, देवळा

हेही वाचा: Corona Updates : सावधान! कोरोना पुन्हा आलाय, अशी घ्या काळजी