Nashik News: उच्चदाब वीजतारांमुळे भीतीचे सावट! अनेक वर्षापासून प्रश्‍न रखडला

High voltage power lines near galleries in Khadkali area
High voltage power lines near galleries in Khadkali areaesakal

Nashik News : घराच्या छतावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाबाच्या वीजतारांच्या समस्येने जुने नाशिककरांसह अन्य विविध भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ओझर येथे घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली आहे.

वीज वितरण विभागाकडून धोकादायक तारा भूमिगत करण्याची मागणी होत आहे. (Fear of high tension power lines question been pending for many yearsa at khadkali area Nashik News)

शहर स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. वीज वितरण विभाग मात्र आजही जुन्या पद्धतीने कारभार हाकत आहे. शहराच्या विविध भागात उघड्यावर विद्युत डीपी बसविणे, घरांचे छत आणि गॅलरीला लागून उच्चदाबाच्या तारा टाकून वीजपुरवठा होत आहे.

ठिकठिकाणी तारेचे जाळे पसरले आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात याचे अधिक प्रमाण आहे. जुने नाशिक भागात खडकाळी, बागवानपुरा, दूध बाजार, भद्रकाली अशा अनेक भागात तारींचे जाळे आजही बघावयास मिळते.

विशेष म्हणजे येथील घरांच्या गॅलरीस लागून वीजतारा जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. अनेक वर्षापासून वीजतारा भूमिगत करण्याची मागणी केली जात आहे. वीज वितरण विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे.

बागवानपुरा भागात अनेक वेळा शॉर्टसर्किट झाल्याचे प्रकारही घडले आहे. दोन ठिकाणी विजेचा धक्क्यामुळे दोन मुले दगावल्याची घटनाही घडली आहे. दोन दिवसांपूर्वी ओझर येथे छतावरून गेलेल्या वीजतारेचा धक्का लागून माय- लेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

High voltage power lines near galleries in Khadkali area
Nashik News: दीड वर्षाच्या कान्हाची मृत्यूशी यशस्वी झुंज

त्यामुळे धोकादायक वीजतारांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वीज वितरण विभाग आणखी किती बळी घेणार, अशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

पारंपारिक मिरवणूक मार्गावर टांगती तलवार

जुने नाशिक परिसरातून जाणाऱ्या पारंपारिक मिरवणूक मार्गावरही ठिकठिकाणी तारांचे जाळे पसरलेले आहे. मिरवणुकीत सहभागी होणारे चित्ररथ त्यात अडकण्याचे प्रकार नेहमी घडत असतात.

अनेक वेळा शॉर्टसर्किट झाल्याचे प्रकारही घडले आहे. असे असताना अद्यापही मिरवणूक मार्गावरील जाळे भूमिगत करण्यात आले नाही. मार्गावर आजही तारेच्या माध्यमातून होणाऱ्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकत आहे.

High voltage power lines near galleries in Khadkali area
Nashik Teacher Protest: माध्यमिक शिक्षकांचे उद्या धरणे आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com