esakal | ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता
sakal

बोलून बातमी शोधा

leopard baby 123.jpg

सोमवारी सापडलेला बिबट्याचा बछडा त्याच दिवशी रात्री मादीने तिच्यासोबत नेला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्र्यंबक कोंबडे यांच्या द्राक्षबागेत सापडलेला दुसरा बछडा वन विभागाने रात्रभर मादीच्या प्रतीक्षेत सुरक्षित ठेवला. मात्र, रात्रभर वाट बघूनदेखील मादी तिकडे फिरकली नाही

ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इंदिरानगर : सोमवार,(ता.1) जूनला सापडलेला बिबट्याचा बछडा त्याच दिवशी रात्री मादीने तिच्यासोबत नेला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्र्यंबक कोंबडे यांच्या द्राक्षबागेत सापडलेला दुसरा बछडा वन विभागाने रात्रभर मादीच्या प्रतीक्षेत सुरक्षित ठेवला. मात्र, रात्रभर वाट बघूनदेखील मादी तिकडे फिरकली नाही

निसर्गाने केली ताटातूट..

मादीने घेऊन जावे म्हणून बछडे ठेवण्यात आले. मात्र, निसर्ग वादळामुळे मादी तिच्या बिबट्यांकडे फिरकलीच नाही. सोमवार, 1 जूनला सापडलेला बिबट्याचा बछडा त्याच दिवशी रात्री मादीने तिच्यासोबत नेला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्र्यंबक कोंबडे यांच्या द्राक्षबागेत सापडलेला दुसरा बछडा वन विभागाने रात्रभर मादीच्या प्रतीक्षेत सुरक्षित ठेवला. मात्र, रात्रभर वाट बघूनदेखील मादी तिकडे फिरकली नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे वातावरण बदलले असून, पाऊस आणि हवा जोरात असल्याने ही मादी तिच्या सोबतच्या बछड्याला घेऊन सुरक्षित ठिकाणी गेल्याने आली नसेल, असा वन विभागाच्या सूत्रांचा अंदाज आहे. (ता.२) सकाळी मादी न आल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्याला मायको सर्कलजवळ असलेल्या वन विभागाच्या विश्रामगृहात नेऊन त्याची तपासणी केली. त्यामुळे बछड्यांना बोरीवली नॅशनल पार्कला पोचविले जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास वाघ यांनी दिली. 

हेही वाचा > लग्न जमल्याच्या आनंदात पार्टी...अन्‌ पार्टीच्या नादात नशिबाने दाखवला असा ठेंगा की...तुम्हीच पाहा ना!

बछड्याची रवानगी बोरीवली नॅशनल पार्कला
साधारण वीस दिवस वयाचा बछडा मादी असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पुन्हा एकदा रियुनियनसाठी प्रयत्न करण्यात येणार होता. मात्र जोराचा पाऊस सुरू झाल्याने हा विचार सोडून देण्यात आला. दिवसभर खास वन्यजीवांच्या पिलांसाठी दिली जाणारी पावडर त्याला देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्याची तपासणी करीत तो सुदृढ आहे. नाईलाज म्हणून या बछड्याला आता बोरीवली येथे पाठविण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यान, वातावरण निवळल्यानंतर ही मादी खात्रीने त्या ठिकाणी परत येईल, अशी भीती परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त करीत तिला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.  

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

loading image
go to top