
नाशिक : लहानपणापासून धार्मिकतेची आवड होती. तसेच, लग्न झाल्यानंतर भोवतालचे वातावरण आणि पतीचा आग्रहामुळे पौरोहित्याकडे वळाले, असे रेवती पारख यांनी ‘सकाळ’ शी संवाद साधताना आपल्या पौरोहित्याच्या प्रवासाविषयी सांगितले. (female rule in Priesthood Revati parakh nashik Latest marathi news psl98)
रेवती पारख यांचे माहेर पुण्याचे, आई धार्मिक असल्याने धार्मिकतेची आवड होती. तसेच, वडिलांच्या बदलीमुळे विविध ठिकाणच्या संस्कृतीचे ज्ञान होत गेले. लग्न झाल्यानंतर त्या तांबट लेन येथे स्थित आहेत. सासरे पुरोगामी विचारांचे, जवळील मंदिरातच त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी त्यांनी सुरू केली होती.
तसेच घरी येणारी मंडळीही आध्यात्मिक उंचीची, त्यामुळे याचा प्रभाव तर होताच शिवाय पतीच्या आग्रहाखातर पौराहित्य वर्गात प्रवेश घेतला. श्रीमती. दुगल यांच्याकडे प्रवेश घेत शिक्षणास २००५ पासून प्रारंभ केला. प्रथम वर्षात वर्गात पहिल्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्याने वेदोक्त शिक्षणास प्रारंभ केला. श्रीमती दुगल आणि साने गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. सामूहिक पठणात गुरुजी महिलांना संधी देतात.
पौरोहित्याच्या अनुभवात कोरोनाकाळातील वातावरण, लॉकडाउन असताना जोशी गृहस्थांचा रूद्र करण्यासाठीचा आग्रह यामुळे त्यांच्यासमवेत ११ मैत्रिणींचा ग्रुप मिळून ऑनलाइन रूद्र पूजन केले.
तसेच, दर रविवारी होणाऱ्या श्रीमती दुगल यांच्या उपासना व सराव ऑनलाइन या वर्गासाठी सर्व तंत्रज्ञानातील व्यवस्था त्या स्वतः करतात. १०० ते १२५ महिलांचा यात सहभाग असतो. तसेच हरसूल येथे आदिवासी आश्रमशाळा येथे मुलांना पंचोपचार पूजा, प्राथमिक पूजा शिकवताना आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.