नाशिक- जिल्ह्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा असल्याचे कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात यूरिया, डीएपी यांसारख्या खतांचे ‘लिंकिंग’ करूनच त्याची विक्री होते. दहा टन यूरिया, डीएपी आदी खतांची खरेदी करताना कंपन्यांकडून ५० ते ६० हजारांचा माल दुकानदारांच्या माथी मारला जातो. त्यांना हा माल शेतकऱ्यांना विकावा लागतो. पण भरारी पथके यापासून चार हात लांबच उभे राहून गंमत बघत असल्याचे त्यांच्याकडील तक्रारींवरून स्पष्ट होते.