Deputy Sarpanch Election : उपसरपंचपदांसाठी फिल्डिंग अन् सदस्यांची 'सहल' वारी!

election
electionesakal
Updated on

जायखेडा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या अन गाव पुढारी थेट जनतेतून निवडून आलेत. आता सर्वांना उपसरपंच निवडीची प्रतिक्षा लागली आहे. त्यासाठी आपला समर्थक, हितचिंतक उपसरपंचपदी विराजमान करण्यासाठी गावागावात रस्सीखेच असून गटागटातही संघर्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Fielding for deputy sarpanch posts and trip of gram panchayat members at baglan nashik news)

नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आलेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबरला पार पडल्या. २० डिसेंबर रोजी निकालही जाहीर झाला. जनतेतून थेट सरपंच निवडण्यात आला. कुठे पॅनलला बहुमताचा कौल, तर कुठे सरपंच निवडून आलेत. कुठे सदस्य निवडून आले तर कुठे बहुमताच्या आकड्यापासून पॅनल दूर अशी स्थिती निर्माण झाली.

त्यामुळे उपसरपंच होणाऱ्या उमेदवारांसमोर नेत्यांकडे बिल्डिंग लावून सदस्यांची जुळवाजुळव करताना नाट्य नव्हेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळत असून काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना भावी उपसरपंच सहलीवर घेऊन रवाना झाले.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात उपसरपंच पदाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. उपसरपंच पदांच्या निवडणुकीत सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे उपसरपंचपद तरी आपल्याकडे राहावे, यासाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

election
Nashik News : नांदगावला हद्दवाढीसह नळपाणी पुरवठा योजना; कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

सरपंच थेट जनतेतून निवडल्यानंतर आता केवळ उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने अद्याप उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तरीही उपसरपंच पदासाठी स्थानिक राजकीय नेते आघाडी प्रमुखांकडून आत्तापासूनच बिल्डिंग लावली जात असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे.

काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एका गटाचा तर सदस्य संख्येचे बहुमत दुसऱ्या गटाकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. सदस्यांमधूनच उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. सदस्य संख्येचे गणित जुळवून आणण्यासाठी आघाडी प्रमुखांकडून व्यूहरचना आखली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेते देखील आपला समर्थक, हितचिंतक उपसरपंच पदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

उपसरपंच पदाची निवडणूक तारीख केव्हा जाहीर होते याकडे ४१ ग्रामपंचायतीचे लक्ष लागून आहे. उपसरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून स्थानिक पातळीवर होणार आहे . अजून उपसरपंच निवडीची तारीख घोषित झाली नसल्याने गावागावांमध्ये उपसरपंच पदासाठी तर्कवितर्क लावण्यास सुरवात झाले आहे. जाहीर होणाऱ्या तारखेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

election
Nashik News : कांद्याचे क्षेत्र वाढल्याने रोपांसाठी शेतकरी त्रस्त

फोडाफोडीच्या राजकारणाला बसला ब्रेक

सत्ता स्थापनेसाठी विरोधी गटाच्या सदस्यांचे फोडाफोडी करणे हे चित्र शासनाच्या थेट जनतेतून सरपंचपद निवडीच्या एका निर्णयामुळे बदलले आहे. शासनाने घेतलेल्या थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाने ग्रामीण भागातील राजकारणाचे चित्र बदलल्याचे पहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पुढारी सर्व ताकद पणाला लावून निवडणूक रिंगणात उतरतात. निकालानंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोठे घोडेबाजार होतात. विरोधक आपले सदस्य फोडू नये यासाठी निकालाच्या गुलालाच्या कपड्यांसह त्यांना गाड्यात बसवून सहलीवर पाठवले जात होते.

निवडणूक निकालापासून सरपंच निवडी पर्यंत होणाऱ्या सरपंचाला सदस्यांची मोठी बडदास्त ठेवावी लागत होती. निकाल ते सरपंच निवडीचा कालावधी म्हणजे होणाऱ्या सरपंचाचा अग्निपरीक्षेचा काळ ठरत होता

election
Nashik News : सटाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com