Nashik News : कांद्याचे क्षेत्र वाढल्याने रोपांसाठी शेतकरी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tensed farmer

Nashik News : कांद्याचे क्षेत्र वाढल्याने रोपांसाठी शेतकरी त्रस्त

नरकोळ (जि. नाशिक) : कांद्याचे आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कसमादे पट्ट्यात कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात असून लागवडीसाठी लागणाऱ्या कांदा रोपे मोठ्या प्रमाणात शिल्लक असले तरी ‘रोप विकत मिळेना फुकट कोणी देईना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (Farmers suffering for seedlings due to increase in onion area Nashik News)

हेही वाचा: Nashik News : चक्‍कर येऊन पडल्‍याने दोघांचा मृत्‍यू

दसऱ्याच्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा रोपे टाकली. परंतु परतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे रोपांची कोणालाही शाश्वती नसल्याने मिळेल तेथून कांदा बियाणे उपलब्ध करून बियाणे टाकली. मोठ्या मेहनतीने रोपे वाचविले मध्यंतरी पडलेली कडाक्याची थंडी कांदा रोपांना पोषक ठरल्यामुळे रोपाची जोमाने वाढ झाली.

त्यामुळे आता लागवड क्षेत्र वाढवून ही रोपे शिल्लक आहेत. परंतु रोपांसाठी विकत मिळेना फुकट कोणी घेईना अशी अवस्था निर्माण झाली आहे. मोठ्या मेहनतीने घरगुती तयार केलेले बियाणांच्या रोपांपेक्षा कंपनीच्या अर्थात पुड्याच्या बियाण्याच्या रोपांना मागणी जास्त आहे. रोपे तयार करण्यासाठी तणनाशक, बुरशीनाशक, फवारणी करून शेतकऱ्यांनी रोपे तयार केली.

हेही वाचा: Nashik News : नांदगावला हद्दवाढीसह नळपाणी पुरवठा योजना; कांदे यांच्या पाठपुराव्याला यश