esakal | Mahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वरसाठी बसेसचे 'असे' असेल शनिवारपर्यंत नियोजन 
sakal

बोलून बातमी शोधा

trimbkeshwar bus stop.jpg

महाशिवरात्री यात्रेनिमित्त सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई, त्र्यंबकेश्‍वर, सोमेश्‍वर, दोधेश्‍वर (ता. बागलाण), सिद्धेश्‍वर, शिरसमणी (ता. कळवण), पारेगाव (ता. चांदवड) व नागापूर (ता. नांदगाव) येथील यात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाने नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून या जादा बसगाड्या धावतील. शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता, महामंडळाने नियोजन केले आहे. शहरासह परिसरातील सोमेश्‍वरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येही वाढ केली आहे. 

Mahashivratri 2020 : त्र्यंबकेश्‍वरसाठी बसेसचे 'असे' असेल शनिवारपर्यंत नियोजन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाशिवरात्री पर्वानिमित्त जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांचे दर्शन भाविकांना घेता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून ते शनिवार (ता.22)पर्यंत विविध मार्गांवर जादा बसगाड्या धावतील, तर शुक्रवारी (ता.21) महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्‍वरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पन्नास जादा बसगाड्या उपलब्ध असतील. 

यात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाचे नियोजन

महाशिवरात्री यात्रेनिमित्त सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई, त्र्यंबकेश्‍वर, सोमेश्‍वर, दोधेश्‍वर (ता. बागलाण), सिद्धेश्‍वर, शिरसमणी (ता. कळवण), पारेगाव (ता. चांदवड) व नागापूर (ता. नांदगाव) येथील यात्रेच्या जादा वाहतुकीबाबत महामंडळाने नियोजन केले आहे. गुरुवार (ता.20)पासून या जादा बसगाड्या धावतील. शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता, महामंडळाने नियोजन केले आहे. शहरासह परिसरातील सोमेश्‍वरला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येही वाढ केली आहे. 

हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

त्र्यंबकेश्‍वरसाठी पन्नास जादा बस; आजपासून शनिवारपर्यंत नियोजन 

जुने सीबीएस स्थानक यात्रा केंद्रावरून त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी जादा बसगाड्या उपलब्ध राहतील. गुरुवारी या मार्गावर 24, तर शुक्रवारी (ता.21) पन्नास जादा बसगाड्या उपलब्ध असतील. शनिवारी (ता. 22) 24 जादा बसगाड्यांनी प्रवासी वाहतूक केली जाईल. भगूर बसस्थानक यात्रा केंद्रावरही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. या ठिकाणाहून टाकेदसाठी बस उपलब्ध असतील. घोटी यात्रा केंद्रावरून घोटी ते टाकेद बस उपलब्ध असतील. या तीन दिवसांच्या कालावधीत शहरात येणाऱ्या बसगाड्यांचेही नियोजन केले आहे. तसेच विविध आगारांतून प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्‍त बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. 

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

हेही वाचा > बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!