Dada Bhuse : सर्वपक्षीय नेते का करताय मंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; सविस्तर जाणून घ्या

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal

मालेगाव : बोरी -आंबेदरी धरणाची पाटकॅनॉल चारी बंद करून पाइपलाइनने पाणी नेण्याचा घाट पालकमंत्री दादा भुसे यांनी घातला आहे. या भागातील शेतकऱ्यांचा सदर योजनेला विरोध आहे. शेतकऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. याचीच परिणिती म्हणून प्रकल्पबाधीत शेतकरी गणेश गंजीधर कचवे (रा. दहिदी) यांना आंदोलनस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला. या प्रकरणी पालकमंत्री भुसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Dada Bhuse news
Maharashtra- Gujrat : नाशिक जिल्ह्यातील गावांना 'या' कारणामुळे व्हायचयं गुजरातमध्ये सामील

भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले. बोरी-आंबेदरी बंदिस्त पाइपलाइनला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आंदोलनकर्ते शेतकरी गणेश कचवे यांचा विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी पालकमंत्री श्री. भुसे यांनाच जबाबदार धरले आहे.

सदर शेतकरी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. माजी मंत्री (स्व.) डॉ. बळिराम हिरे यांच्या कार्यकाळात बोरी-आंबेदरी धरण बांधले आहे. माजीमंत्री पुष्पाताई हिरे यांच्या कार्यकाळात या धरणाचा कॅनॉल तयार करून माळमाथ्यावरील कोरडवाहू शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. बोरी आंबेदरी बंदिस्त जलवाहिनीला शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायतींचा विरोध आहे. तसा ठराव करून संबंधित विभागाकडे यापूर्वीच सादर केलेले आहे.

Dada Bhuse news
सह्याद्रीचा माथा : राऊत, बंडाची चर्चा, भारतीताई आणि अण्णा

परिसरातील शेतकऱ्यांनी २८ दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे. न्याय मिळत नसल्याने त्यांच्या भावना तीव्र आहेत. बंदिस्त जलवाहिनी योजनेस शिवसेना, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे. सदरच्या पाइपलाइनमुळे परिसरातील चार ते पाच गांवामधील शेती कोरडवाहू होऊन शेतकरी हे शेतमजूर होतील. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील. त्याची जबाबदारी राज्य शासनाची राहील. पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Dada Bhuse news
Nashik Helmet Drive : वाहनचालकांची कारवाईच्या भीतीने पळापळ; 3 दिवसात 7 लाखांचा दंड वसुल!

निवेदनावर अद्वय हिरे, प्रसाद हिरे, डॉ. तुषार शेवाळे, सुनील गायकवाड, निखिल पवार, राकेश भामरे, शेखर पगार, जितेंद्र देसले, भरत पाटील, भारत म्हसदे, अशोक आखाडे, नंदू सावंत, मदन गायकवाड, गुलाब पगारे, जयेश आहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com