esakal | कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद
sakal

बोलून बातमी शोधा

covid center

कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका व त्यांचे पती हे गेल्या काही दिवसांपासून विविध खोट्या तक्रारी, निवेदन व परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये विनापरवानगी प्रवेश करून त्या ठिकाणी रुग्णांसोबत व्हिडिओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. यामुळे येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: कोरोनावर ‘गूळवेल’ ठरतेय अमृत! गुणकारी फायद्यांमुळे मोठी मागणी

कोविड सेंटरमध्ये स्टंटबाजी

सिडकोत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आम्ही महापौर व महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून संभाजी स्टेडियम येथे कोविड केअर सेंटर सुरू केले. याकरिता पालकमंत्री, महापौर, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. असे असताना याच प्रभागातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कावेरी घुगे यांचे पती गोविंद घुगे हे गेल्या काही दिवसांपासून विविध खोट्या तक्रारी, निवेदन व परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये विनापरवानगी प्रवेश करून त्या ठिकाणी रुग्णांसोबत व्हिडिओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याचे काम करीत आहेत. यामुळे येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा काळात एकमेकाना आधार व मदत करण्यापेक्षा भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली आहे.

हेही वाचा: पैसे मोजणाऱ्यांनाच मिळतोय बेड?; नाशिक शहरात कोरोना बेडचा कृत्रिम तुटवडा

गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिडकोतील कामगारवर्ग व सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठ्या प्रयत्नाने सुरू केलेल्या संभाजी स्टेडियम येथील कोविड केअर सेंटरला विविध कारणांनी बदनाम करणे, विनापरवानगशिवाय सेंटरमध्ये प्रवेश करून त्याचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या गोविंद घुगे नामक व्यक्तीविरोधात मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मुकेश शहाणे यांनी केली आहे.

वारंवार सोशल मीडियावर व्हिडिओ व फोटो वायरल करून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या गोविंद घुगे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करीत आहोत.

-मुकेश शहाणे, नगरसेवक, भाजप

माझी पत्नी प्रभागातील नगरसेविका आहे. या नात्याने मी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जेवण व ऑक्सिजन पुरविण्याचे काम करीत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरवर्तणूक केलेली नाही. तसेच आपण केलेले चांगले काम सोशल मीडियावर टाकणे हे कामसुद्धा चुकीचे नाही.

- गोविंद घुगे, भाजप नगरसेविकेचे पती, सिडको

loading image