Nashik News: फिल्टर प्लांटची युद्धपातळीवर स्वच्छता; वावीसह योजनेतील गावांना मिळणार स्वच्छ पाणी

Ongoing cleaning of filter plant of Akaragawa Regional Water Supply Scheme
Ongoing cleaning of filter plant of Akaragawa Regional Water Supply Schemeesakal

सिन्नर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील फिल्टर प्लांटची युद्धपातळीवर स्वच्छता सुरू आहे.

योजनेच्या तलावाने तळ गाठल्यानंतर होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ वावी गावातील तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केल्यानंतर तहसीलदार, गटविकासाधिकाऱ्यांनी फिल्टर प्लांट शुद्ध करण्याची सूचना दिली होती.

त्यामुळे आता योजनेतील गावांना शुद्ध पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे. (Filter plant cleaning on war footing Villages under scheme will get clean water along with Wavi Nashik News)

वावीसह अकरागाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेतील गावांची टँकरपासून मुक्तता झाली. मात्र, होणारा अशुद्ध पाणीपुरवठ्याचा विषय कायम ऐरणीवर राहिला. गावांकडून वेळेवर वर्गणी जमा होत नसल्याचे कारण देत अशुद्ध पाणीपुरवठ्याला नेहमीच बगल दिली जायची.

गेल्या आठवड्यात वावी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक वेलजाळी, गणेश वेलजाळी, किरण संधान, राकेश आनप, विजय लांडगे यांनी पाण्याच्या टाकीवर चढत अशुद्ध पाणीपुरवठ्याचा विषय पुन्हा चर्चेत आणला.

कोळगाव माळ येथील तलावाने तळ गाठल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे सचिवांकडून सांगण्यात आले. मात्र, फिल्टर प्लांटची दुरवस्था अशुद्ध पाणीपुरवठ्याला जबाबदार असल्याचे आंदोलक तरुणांचे म्हणणे होते.

आंदोलन मागे घेण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, गटविकासाधिकारी महेश पाटील, पंचायत समितीचे पाणीपुरवठा अभियंता बिब्बे यांनी पुढाकार घेतला.

वावीचे सरपंच विजय काटे, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा होऊन गोदावरी नदीच्या आवर्तनाचे पाणी तळ्यात आल्यानंतर वावीसह योजनेतील गावांना पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात आले.

आठवडाभर ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावी, अशी सूचना गटविकासाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार प्रत्येक गल्लीत टँकरद्वारे दिवसाआड प्रत्येक कुटुंबाला किमान चारशे लिटर पाणी देण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली.

Ongoing cleaning of filter plant of Akaragawa Regional Water Supply Scheme
NMC News: महापालिकेची सुरक्षा ठीकठाक! संसद घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सहाय्यक आयुक्तांकडून आढावा

गटविकासाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार दोन दिवसांपासून फिल्टर प्लांटची दुरुस्ती सुरू आहे. फिल्टर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी सांगितले. आणखी दोन दिवस प्लांट स्वच्छ करण्यासाठी जातील.

वॉशआउट केल्यानंतर पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी आवश्यक टीसीएलचा साठा उपलब्ध असल्याचे फिल्टर प्लांटवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

"कोळगाव येथील तलावाने तळ गाठल्यामुळे फिल्टर प्लांटमध्ये गाळ साचला होता. योजनेतील गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र, या गावांकडून वर्गणी दिली जात नाही. वीजपुरवठा, टीसीएल पावडर, आलम खरेदी, कर्मचाऱ्यांचा पगारावरील खर्च प्रत्येक महिन्याला करावा लागतो. पाणीपुरवठा योजनेची थकबाकी जमा करण्यासाठी पंचायत समितीस्तरावरून सहकार्य मिळाले पाहिजे. योजनेचा तलाव आवर्तनात भरला आहे. दोन दिवसानंतर नियमित पाणीपुरवठा सुरू होईल."

-विजय काटे, अध्यक्ष, ११ गावे पाणीपुरवठा योजना

"प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर प्लांटची प्रत्येक महिन्याला स्वच्छता झाली पाहिजे. फिल्टर प्लांटची दोन वर्षांत साफसफाई झाली नसल्याचे तेथील कामगाराचे म्हणणे आहे. यापूर्वी तलावातील पाणी थेट पुरवले जायचे. फिल्टर प्लांटची वरच्या वर स्वच्छता केली जाईल. याकडे योजनेत सहभागी ग्रामपंचायतीने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच सर्वसामान्यांचे आरोग्य जपता येईल."-गणेश वेलजाळी, दीपक वेलजाळी

Ongoing cleaning of filter plant of Akaragawa Regional Water Supply Scheme
MNS News: मराठीत पाट्या लावा नाही, तर 2 हजारांवर दंड! मनसेच्या आंदोलनानंतर येवला नगरपालिका ॲक्शन मोडवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com