Nashik News : अखेर मौजे सुकेणेत ट्रॉंन्स्फॉर्मर आला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity board officials and farmers while installing the transformer on DP No. 806 here.

Nashik News : अखेर मौजे सुकेणेत ट्रॉंन्स्फॉर्मर आला!

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : मौजे सुकेणे येथील रेल्वे लाईनजवळ असलेल्या सुदाम शिंदे यांच्या बांधावर असलेल्या डीपी क्रमांक ८०६ हा ट्रान्सफार्मर गेल्या काही दिवसापासून जळाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. (Finally transformer arrived in Sukene Nashik News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

काही शेतकऱ्यांच्या अनियमित बिलांमुळे ट्रांसफार्मर बसवण्यासाठी अडचणी निर्माण केल्या जात होत्या. शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येत बाकी असलेल्या शेतकऱ्यांकडून वीजबिलाची रक्कम जमा करत वीज महामंडळाला जवळपास ६५ हजार रुपये भरल्यानंतरही ट्रॉंन्स्फॉर्मर मिळण्यास टाळाटाळ केली जात होती.

तेव्हा काही शेतकऱ्यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्याशी संपर्क साधला. श्री. कदम यांनी वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत त्यांना फैलावर घेत तात्काळ डीपी बसून देण्याची सूचना केली.

त्यानुसार रविवारी (ता. १२) ट्रॉन्सफॉर्मर सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने बसविण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यानच्य काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता यातून निर्माण झाला आहे.