Latest Marathi News | सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी सव्वा लाखाचा दंड वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik East division team during punitive action

Nashik : सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी सव्वा लाखाचा दंड वसूल

जुने नाशिक : पूर्व विभागाच्या घनकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जाळल्याप्रकरणी महिनाभरात २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापोटी सुमारे एक लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. अन्य विविध कारवाईतून असा एकूण सुमारे एक लाख ५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे, रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा विलगीकरण न करणे अशा विविध प्रकारची कारवाई पूर्व विभागाच्या घनकचरा विभागातर्फे गेल्या महिन्यात करण्यात आली. (Fine of lakh be levied if garbage is burnt in public places East division squad take punitive action Nashik News)

हेही वाचा: Nashik : मुंडेचा दणका; अधिकाऱ्यांनी घेतली आरोग्यकेंद्रांची झडती

१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, स्वच्छता मुकादम सचिन मांडे, रवी वाघमारे, गौतम पवार, बाळू भोई पथकाने सुमारे ४० जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ५१ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला. त्यात सर्वाधिक दंड सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांना करण्यात आला.

अशा २६ जणांवर कारवाई करत १ लाख ३५ हजारांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे कचरा विलगीकरण न केल्याने तीन जणांना प्रत्येकी ५०० प्रमाणे दीड हजाराचा दंड करण्यात आला. रस्त्यावर कचरा करून अस्वच्छता करणे ६ जणांवर कारवाई करत एक हजार ८० रुपये दंड केला. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने चार जणांवर कारवाई करत चार हजार तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी एक जणांवर कारवाई करत दहा हजारांचा दंड करण्यात आला.

हेही वाचा: Nashik : लाचखोरांची वाढतेय हाव ! शासकीय ITIच्या प्राचार्याला अटक