Latest Marathi News | मुंडेचा दणका; अधिकाऱ्यांनी घेतली आरोग्यकेंद्रांची झडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tukaram Munde News

Nashik : मुंडेचा दणका; अधिकाऱ्यांनी घेतली आरोग्यकेंद्रांची झडती

नाशिक : आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देण्याचा फतवा काढला असून आरोग्य केंद्रांचे ढिसाळ कामकाज सुधारावे यासाठी आरोग्य केंद्रांच्या झाडाझडती घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने पंधरा जिल्हा पर्यवेक्षक व आठ जिल्हास्तरीय अधिका-यांमार्फत आरोग्य केंद्रांच्या गुरूवारी अचानक तपासणी केली.

यात प्रामुख्याने केंद्राची स्थिती, सोईसुविधा, औषधांची उपलब्धता यांचा समावेश आहे. तपासणी केलेला अहवाल संबंधित अधिकारी शुक्रवारी (ता.4) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना सादर करणार असून, ते तपासणी करत आढावा घेणार आहे. यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचा-याचे धाबे दणाणले आहे. (Officials searched health centers District Health Officer will review today Nashik News)

हेही वाचा: Nashik : लाचखोरांची वाढतेय हाव ! शासकीय ITIच्या प्राचार्याला अटक

गुरूवारी (ता.३) दिवसभरात २३ अधिका-यांनी जिल्हयातील २३ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देत तपासणी केली. तपासणी दरम्यान, प्रामुख्याने केंद्रातील औषधांची असलेली उपलब्धता, रूग्णांची तपासणी रजिस्टर, कर्मचा-यांची दैनंदिनी, अॅडव्हान्स टुर प्लॅनप्रमाणे (ओटीपी) कामे होत आहेत की नाही यांची तपासणी करण्यात आली.

क्षयरोग तपासणी, लसीकरण, असंसर्गजन्य आजार (हायपर टेन्शन, मधुमेह, कॅन्सर) याशिवाय डेंग्यू, पिण्याच्या पाण्याची स्थिती, केंद्रातील स्वच्छता, लॅब टेस्ट, महिलांची प्रसतुतीसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता, झालेल्या प्रसुती यांची तपासणी झाली. अति जोखमीच्या मातांची स्थिती, त्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ देण्यात येणा-या सुविधांची अधिका-यांनी तपासणी करत आढावा घेतला.

हेही वाचा: Nashik Crime News : शहर पोलिसांकडून 61 किलो गांजा हस्तगत

या भेटी दरम्यानच्या निरीक्षणांचा अहवाल संबंधित अधिकारी डॉ. आहेर यांना सादर करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी डॉ. आहेर तालुका वैद्यकीय अधिका-यांच्या बैठकीत या अहवालाच्या आधारे आढावा घेतील.

दर आठवड्याला तपासणी

गत महिन्यात डॉ. आहेर यांनी अचानक आरोग्य केंद्रांना भेटी देत आढावा घेतला होता. त्यानंतर मुंडे यांच्या तोंडी आदेशन्वाये आरोग्य केंद्रांच्या तपासणी केल्या जाणार आहे. दर आठवडयाला अशा अचानक तपासणी होणार आहेत. यात आरोग्य केंद्राला कळविले जात नसून अचानक भेटी देऊन तपासणी होणार असल्याने कर्मचा-यांची धांदल उडाली आहे.

हेही वाचा: Nashik : वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ उभारण्याची मागणी