Nashik : मालेगावात गिट्टी गोदामासह 5 घरे आगीत भस्मसात

A fire broke out at a ballast warehouse in Najmabad area.
A fire broke out at a ballast warehouse in Najmabad area.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आगीचे प्रमाण वाढले आहे. येथे चुनाभट्टी भागात आठवड्यापूर्वी रोहित्राला आग लागली होती. काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे रमजानपुरा व नजमाबाद भागात यंत्रमाग कारखान्याला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

येथील नजमाबाद भागातील अलीबाग येथे मोहंमद हारुण मोहंमद इब्राहीम यांच्या गिट्टी गोदामाला गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. गोदामाबरोबरच पाच घरेही जळून खाक झाली. आठवड्यात दुसऱ्यांदा मोठ्या स्वरुपाची आग लागण्याचा प्रकार घडला. (fire accident in warehouse at Malegaon 5 houses gutted in fire Nashik Latest Marathi News)

A fire broke out at a ballast warehouse in Najmabad area.
Nashik Crime News : दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट!; 4 दुचाक्या लंपास

गिट्टी कारखान्याला लागलेल्या आगीचे लोळ आकाशात दिसत होते. मध्यरात्री हवा असल्यामुळे काही वेळातच आगीने शेजारील घरांना विळखा घातला. गोदामाच्या शेजारी राहणाऱ्या शेख शब्बीर शेख अब्बास, मोहंमद जावीद मोहंमद युसूफ, मोबीन, नदीम, सुलतान या पाचही रहिवाशांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

प्रसंगावधान दाखवून पाचही कुटुंबातील नागरीक घराबाहेर पळाल्याने सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचली नाही. पाचही कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गरिबांची फळी व पत्र्याचे घर जळाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. अग्निशामक दलाचे बंब वेळेत पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. तथापि, वाऱ्यामुळे वाढलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिकस्त करावी लागली.

साहित्य जळून खाक

गिट्टी कारखान्यातील गिट्टी व इतर साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या २५ बंबांनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी अग्निशमन अधिक्षक संजय पवार, मनोहर तिसगे, शकील तैराक, रविंद्र महाले, याया खान आदींनी परिश्रम घेतले. या घटनेची अग्निशामन दलात आगीची नोंद घेण्यात आली आहे.

A fire broke out at a ballast warehouse in Najmabad area.
Fraud Crime : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत 3 कोटीचा गैरव्यवहार; चौघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com