ठेंगोड्यात भंगार दुकानास आग; 5 लाखांचे नुकसान

Scrap shop fire
Scrap shop fireesakal

ठेंगोडा (जि. नाशिक) : येथील गणेशनगर भागातील समाधान राजपूत यांच्या ठिबक सिंचन भंगार नळी, प्लॅस्टिक, फायबर, लोखंड ठेवलेल्या गुदामाला (Scrap Shop) पहाटे आग लागली. (Fire at scrap shop in Thengoda Loss of Rs 5 lakh Nashik News)

Scrap shop fire
Nashik Crime : 2 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे जप्त; 6 संशयितांना अटक

अनोळखी व्यक्तीने आग लावल्याचा संशय असून, आगीत सुमारे पाच लाखांचे प्लॅस्टिक व भंगार खाक झाले. सटाणा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. गुदामात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समाधान राजपूत यांनी दिली. आगीच्या घटनेचा पंचनामा येथील तलाठी योगेश जाधव, कोतवाल हंसराज सोनवणे यांनी केला. पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Scrap shop fire
Nashik : सेल्समनला अनोळखी महिलेचा 5 लाखांना गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com