
Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी
मालेगाव (जि. नाशिक) : शहरात टोळक्यांनी व गुंडांनी (Goons) वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालविला आहे. यामुळे शहराला वेठीस धरण्याचा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. येथील देवीचा मळा भागात दहशत निर्माण करत शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री टोळक्याने (Mob) धुडगूस घातला. संतप्त झालेल्या जमावाने टोळक्यास हाकलून लावतानाच त्यांच्या दोन दुचाकी जमावाने जाळून (Bike Burnt) टाकल्या. शाह प्लॉट भागात हा प्रकार घडला. (2 bikes burnt by mob in Devicha mala area Nashik Crime News)
हेही वाचा: मालेगाव परिसरात अल्पवयीन मुलींचे अपहरण
गुन्हेगारी पाश्र्वभूमीवर असलेल्या टोळक्याने दुचाकीवर येत शाह प्लॉट भागात गोंधळ व आरडाओरड करण्यास सुरवात केली. नागरिकांनी विरोध केल्यानंतर टवाळखोर पळू लागले. या गदारोळात संबंधितांच्या दोन दुचाकी घटनास्थळी राहून गेल्या. संतप्त जमावाने दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. दुचाकींचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव, पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत भोये व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. यापूर्वीही संबंधित टोळक्याने तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता, असे येथील रहिवाशांनी सांगितले. पवारवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याप्रकरणी दंगल व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा: ठेंगोड्यात भंगार दुकानास आग; 5 लाखांचे नुकसान
Web Title: 2 Bikes Burnt By Mob In Devicha Mala Area Nashik Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..