ZP Fire Accident : जिल्हा परिषदेत शॉर्टसर्किटने आग

Fire accident
Fire accidentsakal

ZP Fire Accident : जिल्हा परिषदेतील व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाच्या मागील वातानुकूलित यंत्रणेला शॉर्टसर्किटने मंगळवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.

मात्र, यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत आग प्रतिरोधक यंत्राचा वापर केल्याने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. (Fire in Zilla Parishad due to short circuit nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्यालयातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना शेजारील व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाच्या मागील बाजूस असलेल्या बाहेरील वातानुलुकीत यंत्राच्या मशिनमध्ये बिघाड होऊन अचानकपणे धूर येऊ लागला.

हा धूर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील सहाय्यक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच तेथे उपस्थित असलेल्या प्रसाद देशमुख या कर्मचाऱ्यास खाली पाठवत यंत्रणा बंद करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fire accident
Nashik News : मखमलाबाद नाका ते पेठ फाटा रस्त्यावरील रेलिंग गायब


त्यानंतर तातडीने अग्निशामक यंत्रणेला संपर्क केला आणि परिसरात लावण्यात आलेल्या आगप्रतिबंधक उपकरण वापरले. आग ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणापासून जवळच वित्त विभाग, पशुसंवर्धन आणि समाजकल्याण विभाग असून, येथे मोठी गर्दी असते.

मात्र, कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेने मोठा अनर्थ यावेळी टळला. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे यामुळे अभिनंदन केले आहे.

जिल्हा परिषदेत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आगप्रतिरोधक उपकरणांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले. जिल्हा परिषद प्रशासनाने फायर ऑडिट देखिल नियमित केले असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी स्पष्ट केले.

Fire accident
NMC News: राधाकृष्ण गमे रजेवर, लक्ष्मीकांत साताळकर रुजू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com