Fire Drill : पानेवाडी प्रकल्पात इंधन टाकी व्हॉल्वजनवळ आग; सुरक्षा यंत्रणेकडून ‘मॉकड्रील’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Drill

Fire Drill : पानेवाडी प्रकल्पात इंधन टाकी व्हॉल्वजनवळ आग; सुरक्षा यंत्रणेकडून ‘मॉकड्रील’

मनमाड (जि. नाशिक) : पानेवाडी (ता. नांदगाव) भारत पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन टाकीच्या व्हॉल्व्हजवळ अचानक आग लागल्याने धोक्याचा सायरन वाजू लागला. आग लागल्याचे कळताच सर्वत्र धावपळ उडाली.

त्यानंतर क्षणार्धात कंपनीचे ऑपरेटिंग बंद करण्यात आले. सर्व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर संकट टळले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मात्र हे सर्व अचानक आग लागल्यास कंपनीतील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कशी सुसज्ज आहे. याचे प्रात्यक्षिक होते. (Fire near fuel tank valve in Panewadi project Mock drill by security forces nashik news)

पानेवाडीच्या २२६ एकरातील आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा गणला जातो. यावेळी याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आग लागल्यानंतर काय करावे याचे मॉकड्रील करण्यात आले.

यात भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पात इंधन टँकच्या व्हॉल्व्हजवळ लिकेज झाल्याने अचानक आग लागली. धोक्याच्या सायरणने सर्वांनाच धोक्याचा इशारा दिला. तत्काळ कंपनीतील सर्व यंत्रणा बंद करण्यात आली.

सर्वांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या. आगीचे ठिकाण लक्षात घेऊन कंपनीतील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली. आगीवर फोम पाण्याचा मारा उच्च क्षमतेने करण्यात आल्याने अवघ्या वीस मिनिटात आग आटोक्यात आली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

पानेवाडी इंधन प्रकल्प सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहर आणि ग्रामीण परिसराच्या जवळ आहे. त्यामुळे शहराची, ग्रामीण भागाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये. यासाठी कंपनीची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कशी कार्यान्वित आहे.

नागरिक आणि ग्रामस्थ कसे सुरक्षित असून परिस्थितीला तोंड देण्यासाठी कसे सक्षम आहोत यासाठी कंपनीकडून मॉकड्रिल असल्याचे मुख्य प्रबंधक प्रशांत खर्गे यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, प्रभाकर सोनवणे, अलीम शेख, आशिष लंवगारे, योगेश अतरदे, अशोक पाईक, नागापूरचे सरपंच राजेंद्र पवार, इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी राहुल गुप्ता, भारत पेट्रोलियमचे रोशन टिवलेकर, अंकित कोलहन उपस्थित होते.

टॅग्स :Nashikfiremock drill