RTE Admission : इगतपुरी तालुक्यात आरटीई अंतर्गत प्रवेशास सुरवात; या तारखेपर्यंत मुदत

RTE Admission
RTE AdmissionSakal

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात आरटीईअंतर्गत खासगी विनानुदानित, कायम विनानुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे येत्या १७ मार्चपर्यंत पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केले. (Admission under RTE started in Igatpuri taluka till 17 march nashik news)

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये आरटीईच्या २५ टक्के राखीव आरक्षणांतर्गत तालुक्यातील पहिलीच्या वर्गासाठी १६ शाळांमध्ये १११ जागांसाठी मोफत प्रवेशाची संधी मिळणार आहे. शासनाच्या या निकषानुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रवेश मिळालेल्या पालकांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चिती करून घेणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी एकच लॉटरी काढण्यात येणार असून, शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षायादी राहणार आहे.

पालकांना निवासाचा पुरावा, पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

RTE Admission
SAKAL Impact : अवलियाच्या मदतीला ज्येष्ठांनी दिला हात! जय श्रीराम जॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी केले मैदान साफ

इगतपुरी तालुक्यातील १६ शाळा अशा (कंसात प्रवेशसंख्या) :

अभिनव बालविकास मंदिर, इगतपुरी ( ४), असीमा बालशैक्षणिक केंद्र, आवळखेड (११), लिटिल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल (१८), पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूल, टाके घोटी (७), नित्यानंद इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक (८ ), आर्य चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक (१३), आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक (९), आनंद इंग्लिश मीडियम स्कूल घोटी बुद्रुक (१), चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल, साकूर (३), प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल, कवडदरा (९), श्री सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, भरवीर बुद्रुक (१), फिनिक्स ॲकॅडमी, मुंढेगाव (७), राजलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल, गोंदे दुमाला (८), ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, वाडीवऱ्हे (४), सिद्धकला इंग्लिश मीडियम स्कूल, वाडीवऱ्हे (२), एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, वाडीवऱ्हे (४), स्पिड वेल एज्युस्पोर्ट्स स्कूल, वाडीवऱ्हे (६), स्ट्रॉबेरी स्कूल, वाडीवऱ्हे (७).

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

RTE Admission
Onion Crisis : कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा; माजी ZP सदस्या सीमंतिनी कोकाटे

आवश्यक पुरावे : प्रवेशासाठी पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, तहसीलदार यांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, पालकाचा रहिवासी पुरावा आदी कागदपत्रांसह पालकांनी

www.rte 25% admission.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याशी संपर्क साधण्याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांनी कळविले आहे.

RTE Admission
Nashik News : कानडी मळा, ऐश्वर्या गार्डन परिसराचा कायापालट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com