जुने नाशिक: अग्निशामक दलाच्या रेस्क्यू ऑपरेशनने लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे चौघांचे प्राण वाचले. सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नांनंतर चौघांना बाहेर काढण्यात यश आले. अचानक लिफ्ट बंद झाल्याने घटना घडली. यामुळे लिफ्टमधील प्रवास सुरक्षेचा पुन्हा प्रश्न उपस्थित झाला.