नाशिक- गेल्या आठ दिवसांत शहरात आग लागण्याच्या तब्बल २३ घटना घडल्या आहेत. या निमित्ताने सुरक्षाविषयक साधनांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, फायर ऑडिट करणे बंधनकारक असताना ६६७ आस्थापनांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. फायर ऑडिटबरोबरच इलेक्ट्रिकविषयक साधनांचेही वर्षातून दोनदा ऑडिट बंधनकारक असताना महापालिकेनेच एजन्सी नियुक्त केली नसल्याची बाब समोर आली. आग लागण्याच्या घटनांना मालमत्ताधारक जेवढे जबाबदार आहेत, तेवढीच महापालिकाही नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत संवेदनशील नसल्याचे यातून समोर येत आहे.