Nashik Crime News : BJP संपर्क कार्यालयाजवळ फोडले फटाके; 6 समाजकंटकांना अटक

Aarrested
Aarrested esakal

नाशिक : अंबड परिसरातील चुंचाळे शिवारात भाजपच्या संपर्क कार्यालयाबाहेर काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करीत फटाके फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका राजकीय पदाधिकाऱ्यासह सहा जणांना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (firecracker burst near BJP Liaison Office 6 sociopaths arrested Nashik Latest Crime News)

Aarrested
Nashik Crime News: नकली पिस्तूल दाखवत लुटण्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे भामटा गजाआड

यशवंत शंकरराव पवार (रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.२३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व संशयित बाळा नागरे व त्याच्यासमवेत असलेल्या पाच-सहा जणांनी पवार यांच्या घराच्या भिंतीलगत आरडाओरडा करीत फटाके फोडले. तसेच काहींनी त्यांच्या घरावर व दुकानावरही फटाके फेकले. त्यानंतर आरडाओरडा करून संशयित पळून गेले. त्यानंतर याच संशयितांनी संदीप नरहरी तांबे यांच्या भाजप संपर्क कार्यालयाबाहेर शटरजवळ पुन्हा फटाके फोडले.

यावेळी संशयितांनी शिवीगाळ करीत पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितांना अटक केली. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे हे करीत आहेत.

Aarrested
नाशिक: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सीमेवर वीरमरण; दिवाळीत गावावर शोककळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com