Nashik News : मुंजोबा चौकात गोळीबार; महिला जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MD

Nashik News : मुंजोबा चौकात गोळीबार; महिला जखमी

पंचवटी : पंचवटीतील फुलेनगर येथील मुंजोबा चौकात काही अज्ञात हल्लेखोरांनी शनिवार (ता. ११) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास गोळीबार करण्यात आला असून, यात एक महिला आणि एक श्वान जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (Firing at Munjoba Chowk Woman injured nashik crime news)

ही घटना परिसरातील वर्चस्वाच्या वादातून घडल्याचे समजते आहे. काही महिन्यांपूर्वी याच हल्लेखोरांच्या नातेवाइकांच्या घरावर हल्ला केला होता. त्याचेच प्रतिउत्तर म्हणून संबंधितांच्या परिसरात जाऊन गोळीबार केला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

दिंडोरी नाका येथे होळीच्या दिवशी युवकाचा गळा चिरत खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Nashikcrime