esakal | ब्रेकिंग : नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus 2.jpg

अखेर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून, जिल्हा रुग्णालयाकडून पाठविण्यात आलेल्या नऊ नमुन्यांपैकी जिल्ह्यात निफाड तालुक्‍यातील 30 वर्षीय तरुणाच्या "स्वॅब'चा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आठ निगेटिव्ह आले आहेत. अहवाल प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

ब्रेकिंग : नाशिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : अखेर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून, जिल्हा रुग्णालयाकडून पाठविण्यात आलेल्या नऊ नमुन्यांपैकी जिल्ह्यात निफाड तालुक्‍यातील 30 वर्षीय तरुणाच्या "स्वॅब'चा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आठ निगेटिव्ह आले आहेत. अहवाल प्राप्त होताच प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. 

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त माहितीनुसार लासलगाव (ता. निफाड)जवळील नंदनवननगर, पिंपळगावनजीक येथील रहिवासी असलेला 30 वर्षीय तरुण हा रजानगर येथील बेकरीत कामाला होता. 12 मार्चला खोकला व ताप आल्याने त्याने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले; परंतु त्याला बरे न वाटल्याने तो लासलगाव ग्रामीण रुग्णालयात 25 मार्चला उपचारासाठी गेला. न्यूमोनियासदृश लक्षणे दिसत असल्याने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. संबंधित तरुण स्वत:च्या वाहनाने 27 मार्चला नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला. त्याला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने विलगीकरण कक्षात दाखल केले. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता. 29) प्राप्त झाला, त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. उर्वरितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, विलगीकरण कक्षात दाखल सात रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे. त्यांना सोमवारी (ता. 30) सोडण्यात येणार आहे. 

कुटुंबातील चौघे क्वारंटाइन 

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या संनियंत्रणानुसार कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हा आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्यधिकारी डॉ दावल साळवे यांचे पथक लासलगाव येथे रवाना झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला युवक हा निफाड येथे गेला असता त्यास कोरोनाची लागण झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे . त्यादृष्टीने निफाड परिसरात कोण परदेशातून आला आहे का याचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या युवकाची प्रकृती स्थिर असून, निमॉनियाचे लक्षण होती. मात्र त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या सान्निध्यात आलेल्याना क्वारंटाइन केले जाणार आहे. मात्र ज्याच्यामुळे या युवकाला लागण झाली आहे तो कोण प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये. परदेशातून आला असाल तर तात्काळ संपर्क साधावा. - डॉ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक.

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​
 

loading image
go to top