
Nashik : बंदीजनांसाठी २० मे पासून अभंग, भजन गायन स्पर्धा
कोकणगाव (जि. नाशिक) : राज्यभरातील कारागृहांमध्ये (prisons) वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २० मे ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचं निमित्त साधून बंदिजनांसाठीच्या या स्पर्धेत २७ संघ सहभागी होणार आहेत. (First Innovative Initiative of State level Bhajan Competition in Asia Nashik News)
ह विभागाने एका अध्यादेशाद्वारे कारागृहातील बंदिजनांसाठी ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तुरुंग महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब मोरे-देहूकर, डॉ. रामचंद्र देखणे, नितीन महाराज मोरे आणि योगेश देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
हेही वाचा: गारगोटीच्या सौंदर्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थक्क!
बंदिजनांसाठी आयोजित केलेली ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितलं. स्पर्धेचे नियोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा.किरण सानप व उपाध्यक्षा प्रज्ञा तोरसकर पाहत आहेत.
हेही वाचा: Nashik : तापमानात वाढीमुळे ग्रामीण भागात भर दुपारी अघोषित संचारबंदी
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ संघांना दीना आणि प्रकाश धारिवाल यांच्या वतीने संवादिनी, तबला, पखवाज, दहा जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची फ्रेम आणि प्रेरणायादी शंभर पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.
Web Title: First Innovative Initiative Of State Level Bhajan Competition In Asia For Prisoners Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..