गारगोटीच्या सौंदर्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थक्क! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeary

गारगोटीच्या सौंदर्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थक्क!

लेखक - के. सी. पांडे

गारगोटी म्युझियमची निर्मिती वाखाणण्यासारखी आहे. गारगोटीतील नैसर्गिक रंग व ते बघून मिळणारी ऊर्जा ही आपण आपल्या स्वतःमध्ये आणली पाहिजे असे गौरवोद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी काढले होते.

२६ एप्रिल २००१ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गारगोटी संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी येणार हे निश्चित झालं. माझ्या सर्वतोपरी प्रयत्न करून मी तयारी सुरुवात केली शिवसेनाप्रमुख ठाकरे आल्यापासून ते उद्घाटन संपेपर्यंत त्यासाठीची सूक्ष्म नियोजन नियोजन करण्यात आले. मी माजी सैनिक असल्यामुळे शिस्त, टापटीपपणा वेळेचे महत्व या सर्व बाबी माझ्यात अंगभूत होत्याच, पण मी त्या काटेकोरपणे नंतरचाही माझ्या सर्व आयुष्यात पाळल्या. शिवसेनाप्रमुख ठाकरे आल्यानंतर सर्वप्रथम स्वागत त्यानंतर गारगोटी संग्रहालयात भेट यादरम्यान नियोजित वेळेपेक्षा ही अधिक वेळ त्यांनी गारगोटी दगड बघण्यात दिला. प्रत्येक मिनरलबद्दल बारकाईने चौकशी करत. त्याचे महत्त्व त्याच्यातून मिळणारी ऊर्जा याबद्दलची माहिती समजून घेत. दगड हे निर्जीव आहे असे मानतात, पण त्यात खऱ्या अर्थाने जिवंतपणा व त्यातील सौंदर्य पांडे तुम्ही जगाला दाखवून दिले. कर्म, भक्ती व देशप्रेम यामुळे गारगोटीच्या प्रवेश आतच भारतमाता मूर्ती स्थापन केली आहे, याबद्दल विशेष कौतुक केले. संपूर्ण संग्रहालय बघितल्यानंतर हे व्यासपीठावर सर्वांना संबोधित मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुख ठाकरे म्हणाले,‘ भूगर्भातील गारगोटी दगडांचे अविश्वसनीय सौंदर्य व निसर्गाची किमया बघून मी थक्क झालो. पांडेजी माझ्या घरी आले होते, त्यांनी मला कल्पना दिली त्यांच्या जगावेगळ्या छंदाबद्दल माझ्याही मनात आले, काय दगड बघायचे, असे कितीतरी दगड मी मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर बघत असतो. त्यांच्यामध्ये काही तेज नाही, पण पांडेंकडील गारगोटी दगड हे त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळे आहे. आपण कधीतरी म्हणतो कुठे हिरा, कुठे गारगोटी पण गारगोटीपासून हिरा बघतो. हिऱ्यापासून कधी गारगोटी बनत नाही.

हेही वाचा: दोष ना कुणाचा...

भूगर्भाच्या अंतरंगात अकल्पनीय रंग आहे काय याची कधी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे हे सर्व शोधण्यासाठी केलेले अपार कष्ट चिकाटी यास तोड नाही. हे अत्यंत अवघड असे काम श्री पांडे यांनी केली मी खरंच त्यांचे कौतुक करतो. माणसाला कसलं तरी वेड लागल्याशिवाय जागतिक दर्जाची गारगोटी सारखी म्युझियम उभे राहत नाही यासाठी पूर्ण झोकून देऊन जागतिक दर्जाचे काम कसे घडवायचे हे पांडे यांनी दाखवून दिले आहे गेली 26 वर्ष पांडे दगड शोधताय. गारगोटी म्युझियम निर्मिती वाखाणण्यासारखी आहे. गारगोटीतील नैसर्गिक रंग व ते बघून मिळणारी ऊर्जा ही आपण आपल्या स्वतःमध्ये आणली पाहिजे. मी खऱ्या अर्थाने पांडे यांचे धन्यवाद मानतो, की त्यांनी जागतिक दर्जाचे म्युझियमची निर्मिती महाराष्ट्रात केली आणि ते इतक्या उंचीवर पोहोचविले, याचे श्रेय फक्त श्री. पांडे यांची शोधक वृत्तीस आहे.


कॅलसाइट (स्थळ : जळगाव)
फायदे ऊर्जा वाढवण्याची आणि मन शुद्ध करण्याची तसेच जीवनचक्र संतुलित करण्याची क्षमता आहे. हे नकारात्मक ऊर्जा शोषून आणि परिवर्तन देखील करू शकते. कॅल्साइट हे एक स्फटिक आहे जे मन शांत करते आणि मानसिक स्पष्टता वाढवते आणि ते भावनांना बुद्धीशी जोडते.

हेही वाचा: ढिंग टांग : असली नकली!

स्कूलीसाईट (स्थळ : नाशिक)

फायदे : स्कूलीसाईट हे उच्च कंपन क्रिस्टल्सपैकी एक आहे, जे खोल आंतरिक शांती आणि आध्यात्मिक परिवर्तन सुलभ करते. विशेषत: आत्म्यशक्तीसाठी मजबूत दगड आहे. तुम्हाला शांत आणि आरामशीर वाटण्यासाठी हे एक अद्भुत क्रिस्टल आहे. तुमच्या उशाजवळ एक दगड ठेवा, कारण शांत झोपेसाठी हे खूप फायदेशीर आहे. हा एक दगड आहे जो हृदयाला जागृत करतो कारण त्याचा हृदयापासून वरच्या चक्रांमध्ये तीव्र अनुनाद असतो. एकदा तुम्ही ते वापरल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात आणलेल्या अद्भुत भेटवस्तूंची प्रशंसा कराल. हे सुंदर स्फटिक तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या असलेल्या गोष्टी आणण्यास मदत करते, कारण ते तुम्हाला तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

(लेखक सिन्नरस्थित गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक प्रमुख आहेत)

Web Title: Article On Balasaheb Thackeray Visit Gargoti Museum Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top