UGC NET Exam : पहिल्‍या टप्‍यातील 'नेट' परीक्षा शुक्रवारपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UGC NET Exam

UGC NET Exam : पहिल्‍या टप्‍यातील 'नेट' परीक्षा शुक्रवारपर्यंत

नाशिक : नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर यूजीसी-नेट डिसेंबर २०२२ सत्र या परीक्षेचे आयोजन केले आहे. मंगळवार (ता.२१) पासून या परीक्षेला सुरवात झालेली आहे. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा शुक्रवार (ता.२४) पर्यंत पार पडणार असून, ५७ विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. (First phase UGC NET exam till Friday nashik news)

कोरोना महामारीपासूनच परीक्षांचे वेळापत्रक कोलमडलेले आहेत. अशात गेल्‍यावर्षी डिसेंबर सत्रात नियोजित असलेली यूजीसी-नेट परीक्षा दोन महिने विलंबाने होते आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या परिक्षार्थींना गेल्‍या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले होते.

अर्जाचा क्रमांक व जन्‍म तारीख याबाबतचा तपशील दाखल करून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची सुविधा होती. दरम्‍यान 'एनटीए' यांच्‍यामार्फत पहिल्‍या टप्‍यात ५७ विषयांकरीता यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

चार दिवस चालणाऱ्या या परीक्षेसाठी नाशिकमध्ये एक परीक्षा केंद्र असून सुमारे दीड हजार परीक्षार्थी या परीक्षेला सामोरे जातील. एकूण ८३ विषयांकरीता परीक्षा होणार असल्‍याने राहिलेल्‍या विषयांची परीक्षा दुसऱ्या टप्‍यात घेतली जाणार आहे.

यापूर्वी जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार १० मार्चपूर्वी ही परीक्षा घेतली जाणार असल्‍याची शक्‍यता आहे. सविस्‍तर वेळापत्रक मात्र अद्यापपर्यंत जारी करण्यात आलेले नाही.

टॅग्स :NashikNET ExamNET