
नाशिकच्या 'लक्ष्मी' लघुपटाला जागतिक स्तरावर प्रथम पारितोषिक
नाशिक : जागतिक स्तरावरील ‘अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल’(American Society of Safety Professionals) या अमेरिकेतील संस्थेच्या भारतात झालेल्या नवव्या भारतीय प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समधील(Indian Professional Development Conference) सुरक्षा(Safty) आणि आरोग्यावर(Health) लघुपट स्पर्धा घेण्यात आली. त्यात नाशिकचे प्रसाद देशपांडे यांच्या ‘स्वच्छता’ यावर आरोग्यासाठी जनजागृती करीत असलेल्या लक्ष्मी लघुपटाला(short film) प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (First prize for the short film Lakshmi)
आशयपूर्ण निर्मिती!
२०१५ मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी त्यांनी प्रथमच गंगा म्हणजे पाणी प्रदूषणावर पहिला ‘गंगा माँ का दर्द’ हा लघुपट तयार केला होता आणि त्याला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट लघुपट म्हणून सन्मानित केले होते. प्रसाद देशपांडे व्यवसायाने सुरक्षा पर्यावरण आणि आरोग्याधिकारी म्हणून खासगी कंपनीत कार्यरत आहेत. नाशिकमधून गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानुसे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक सुरक्षा अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले.
हेही वाचा: Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO
हेही वाचा: 'खिशात ठेवलेले राजीनामे तेव्हा का नाही बाहेर काढले?'
Web Title: First Prize For The Short Film Lakshmi Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..