
Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO
नाशिक : ब्रेक द चेन मोहीमेत (break the chain) पोलिसांनी निर्बंध कडक (strict lockdown) करीत आजपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आली असून, दुपारनंतर शहरात नाकाबंदी करुन पोलिस (police) रस्त्यावर उतरले. दुपारनंतर मास्क (wear mask) न वापरणारे विनाकारण फिरणाऱ्यां विरोधात पोलिसांनी कारवाया सुरु केल्या. काही ठिकाणी सौम्य छडीमार करावा लागला. त्यानंतर तासाभराच्या कारवायानंतर शहरात सगळीकडे शुकशुकाट झाला. (police beaten in lockdown nashik marathi news)
टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद
शहर - जिल्ह्यात येत्या २३ मे पर्यत लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यानुसार दुपारी बारानंतर रस्त्यावर फिरण्याला प्रतिबंध आहे. वैद्यकिय कारणाशिवाय बाहेर न पडण्याचा नियम असल्याने पोलिसांनी रस्त्यावरील गर्दीच्या नियंत्रणाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली. शहरात प्रमुख मार्गावर साधारण ४० ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर बॅरेकेडीग करुन वाहनांच्या तपासण्या करण्यात आली आहे. बॅरेकेडींगनंतर शहरात पोलिसांनी कारवाया सुरु केल्या आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या लॉकडाउनच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पोलिसांनी शहरातील विविध तेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या १३४ जणांवर कारवाया करीत, ६२ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांशिवाय ३ आस्थापनावर कारवाई करीत ७ हजार ५०० रुपये दंड आकारला संचारबंदीच्या उल्लंघनावरुन पोलिसांनी ९३ जणांकडून ३९ हजार रुपये दंड वसूल केला या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या असता त्यांत ४ जण पॉझीटीव्ह आले.
हेही वाचा: निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी
दुपारनंतर शुकशुकाट
शहर पोलिसांनी आज दुपारपासूनच विना मास्क फिरणाऱ्यावर तसेच विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाया सुरु केल्या ठिकठिकाणी उशीरापर्यत कारवाया सुरु होत्या. उपनगर परिसरात पोलिसांनी टवाळखोरांना आवरतांना सौम्य छडीमार केला. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरला पोलिसांनी रस्त्यावर उतरुन कारवाया केल्या.विनामास्क फिरणारे चौघे, संचारबंदीच्या उल्लंघन करणाऱ्या ३५ जणांवर कारवाया करतांना पोलिसांनी अनेक ठिकाणी रिकामटेकड्यांना प्रसाद दिल्यानंतर साधारण तासाभराच्या कारवायानंतर नाशिक शहरात सगळीकडे शुकशुकाट पसरला. शहरातील सगळ्या पोलिस ठाण्याचे पोलिस काही वेळातच रस्त्यावर उतरल्यानंतर दुपारनंतर शहरातील रस्ते ओस पडले.
हेही वाचा: लसवाटपात नाशिकवर अन्याय; भाजप नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली भावना
Web Title: Police Beaten In Lockdown Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..