Nashik News: गिर्यारोहकांसाठी ‘सह्याद्री ही एक वारी’ : लेखक आनंद पाळंदे

गिर्यारोहकांचे पहिले ‘सह्याद्री मित्र संमेलन’
Sahyadri Mitra Samelan
Sahyadri Mitra Samelanesakal

Nashik News : पूर्वजांनी निर्माण केलेला गड-किल्ल्यांचा ठेवा जतन करण्यासाठी गिर्यारोहकांनी ‘ट्रेकिंग’ ही चळवळ शिक्षित केली पाहिजे. नाशिक गड-किल्ल्यांचे शहर असून, या ठिकाणी गिर्यारोहकांना खास सुविधा मिळतात.

त्यांच्यासाठी सह्याद्री ही एक वारी आहे, तिचा आनंद घ्यायला शिका, असे गिर्यारोहकांच्या पहिल्याच संमेलनाचे अध्यक्ष, लेखक आनंद पाळंदे यांनी सांगितले. या संमेलनात नाशिकला अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे उभारण्याच्या विरोधातील ठरावही बहुमताने मंजूर करण्यात आला. (First Sahyadri Mitra Samelan of mountaineers nashik)

सह्याद्री मित्र संमेलन
सह्याद्री मित्र संमेलनesakal

अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पहिले ‘सह्याद्री मित्र संमेलन’ नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे शुक्रवारी (ता. ७) झाले. त्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पाळंदे बोलत होते. रंगराव पाटील, हरीश कपाडिया, उषा पागे, डॉ. सुनील वर्तक आदी उपस्थित होते.

‘ट्रेक द सह्याद्री’ या पुस्तकाचे लेखक हरिश कापडिया यांना ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कापडिया यांचा ‘सह्याद्री ते हिमालय’ हा ५० हून अधिक वर्षांचा प्रवास त्यांनी उलगडला.

आनंद पाळंदे म्हणाले, की पूर्वी डोंगर भ्रमण करताना सोयी-सुविधा नव्हत्या. आता ट्रेकिंगला जातांना खास सुविधा असतात. माध्यमे बदलली, हजारो ट्रेकर्स निर्माण झाले. त्यामुळे तिथे घडणाऱ्या घटना माध्यमांमध्ये पसरतात.

ट्रेकिंगच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यासाठी जागरूकता, प्रसार करण्याची गरज आहे. ट्रेकिंग हे आकडेवारी, उंची, सर्वांनी एकत्र येऊन जायला हवे, असे नाही, तर केव्हाही जा आणि भटकंतीचा आनंद घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘सह्याद्रीरत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय अमृतकर यांनी आभार मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sahyadri Mitra Samelan
Nashik News: कवी संदीप जगताप यांचा भुईभोग कवितासंग्रह अभ्यासक्रमात!

संमेलनात चार ठराव मंजूर

- त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे उभारण्यास विरोध

- प्लॅस्टिक व कचरामुक्त सह्याद्री

- लग्न समारंभात मावळ्यांचा ड्रेस परिधान करून प्रवेशद्वारावर उभे करण्यास विरोध

- ट्रेकिंग हब ऑफ इंडिया नाशिकला व्हावे

संमेलनातील पुरस्कारार्थी

सह्याद्रीरत्न पुरस्कार : हरीश कापडिया (५१ हजार)

मोबाईल लॅण्डस्केप फोटोग्राफी : पृथ्वीराज शिंदे (९ हजार)

कॅमेरा फोटोग्राफी : संग्राम गोवर्धने (११ हजार)

ब्लॉगर ऑफ द इयर : प्रांजल वाघ (११ हजार)

बहुआयामी ट्रेकर : दिलीप वाटवे

बेस्ट वाटड्या ऑफ द इयर : कमळू पोकळा (११ हजार)

ट्रेकर ऑफ द इयर : नितीन मोरे

दुर्ग संवर्धन टीम ऑफ द इयर : बा. रायगड परिवार, महाराष्ट्र

रेस्क्यू टीम ऑफ द इयर : शिवदुर्ग मित्र, लोणावळा

ट्रेकिंग हब ऑफ इंडिया राजगड फिल्म : स्वप्नील पवार (रानवाटा)

गिरीभ्रमणकार सन्मान : रंगराव पाटील, शांताराम रायते, घनश्याम वर्मा, अतुल अग्रवाल, छाया काळे

Sahyadri Mitra Samelan
NMC News: ब्‍लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे लवकरच होणार जमीनदोस्त; अतिक्रमण, नगररचना विभागाकडून संयुक्‍त मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com