NMC News: ब्‍लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे लवकरच होणार जमीनदोस्त; अतिक्रमण, नगररचना विभागाकडून संयुक्‍त मोहीम

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal

NMC News : महापालिका अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभाग यांच्‍यामार्फत संयुक्‍त मोहीम राबविली जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत ब्‍लॅक स्‍पॉटवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार आहेत. (Black spot encroachments soon to be ground breaking joint campaign by Department of Encroachment Urban Planning nashik NMC)

काही दिवसांपूर्वी ब्लॅक स्‍पॉटवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभाग यांच्‍यात वादाची ठिणगी पडली होती. मात्र आता या दोन्‍ही विभागांनी एकमेकांशी समन्‍वय साधत मोहीम राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे.

त्‍यानुसार येत्‍या आठवड्यात भीषण अपघात घडलेल्‍या छत्रपती संभाजीनगर मार्गावरील मिरची चौक तसेच इतर सहा चौकातील अतिक्रमणापासून होणार आहे. तत्‍पूर्वी बांधकाम व नगररचना विभागाने सर्वेक्षण करताना शहरातील सुमारे तीनशेपेक्षा जास्‍त ब्‍लॅक स्‍पॉट निश्‍चित केले होते.

संबंधित अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असली तरी, नगररचना विभागातर्फे यादी उपलब्‍ध केली जात नसल्‍याचा दावा केला जात होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
NMC School News : बांधकाम विभागाचा शाळा दुरुस्तीकडे काणाडोळा; महापालिकेच्या 30 शाळा नादुरुस्त

यादीसाठी वारंवार स्‍मरणपत्रे दिल्‍याचा दावा अतिक्रमण विभागाकडून केला जात असताना, संबंधित यादी उपलब्‍ध केली असल्‍याचा दावा दुसरीकडे नगररचना विभागाकडून होत होता. या संभ्रमावस्‍थेमुळे मात्र अतिक्रमणांना अभय मिळत असल्‍याचे बोलले जात होते.

अखेर दोन्‍ही विभागांनी समन्‍वय साधत संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार आगामी काळात या ब्‍लॅक स्‍पॉटवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत.

NMC Nashik News
Nashik Accident News: फोन करूनही शासकीय रुग्णवाहिका मिळालीच नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com