CA Result: सीए अंतिम परीक्षेत जिल्ह्यात यश पहिला! Intermediateमध्ये दिव्‍याचा राष्ट्रीय क्रमवारीत 26वा क्रमांक

Yash Kulthe, Harshal Bhansali, Amena Kachchi, Divya Bora
Yash Kulthe, Harshal Bhansali, Amena Kachchi, Divya Boraesakal

CA Result : दी इन्‍स्‍टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे- जूनमध्ये घेण्यात आलेल्‍या सीए इंटरमिजिएट आणि सीए अंतिम परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.५) जाहीर झाला, अंतिम परीक्षेत नाशिक जिल्‍ह्‍यातून पहिला येण्याचा बहुमान यश नितीन कुलथे या विद्यार्थ्याने मिळविला आहे.

इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकमधून प्रथम येतांना दिव्‍या बोरा हिने राष्ट्रीय क्रमवारीत २६ वा क्रमांक पटकावला आहे. (First success in CA final exam in district Divya 26th National Rank in Intermediate nashik)

'आयसीएआय' यातर्फे झालेल्या अंतिम परिक्षेत यश मिळवितांना देशभरातील तेरा हजार ४३० विद्यार्थी सनदी लेखापाल झालेले आहेत. या परीक्षेत राष्ट्रीय स्‍तरावर अहमदाबाद येथील अक्षय जैन याने पहिला क्रमांक पटकावला.

५७ हजार ६७ विद्यार्थ्यांनी पहिल्‍या ग्रुपची परीक्षा दिली. यापैकी सहा हजार ७९५ विद्यार्थी यशस्‍वी झाले आहेत.

दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्‍या ६१ हजार ८४४ विद्यार्थ्यांपैकी १९ हजार ४३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्‍ही ग्रुपची परीक्षा देणाऱ्या २५ हजार ८४१ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेमध्ये नाशिकच्‍या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सर्व यशस्‍वी विद्यार्थ्यांचे नाशिक सीए शाखेतर्फे अध्यक्ष सीए राकेश परदेशी, उपाध्यक्ष संजीवन ताम्बुळवाडीकर, सचिव जितेंद्र फाफट, खजिनदार अभिजित मोदी, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष मनोज तांबे, विशाल वाणी, माजी अध्यक्ष सोहिल शाह, सीए इइन्‍स्‍टिट्यूटच्या पश्चिम भारत विभागाचे सदस्‍य पियुष चांडक यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Yash Kulthe, Harshal Bhansali, Amena Kachchi, Divya Bora
PSI Success Story: MPSCच्या पहिल्या प्रयत्नात रोहितची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

अंतिम परीक्षेतील यशवंत

अंतिम परीक्षेत नाशिकमधून यश नितीन कुलथे (४३६ गुण) याने प्रथम, हर्षल विजय भन्‍साळी (४२९ गुण) दुसरा, अमेना इरफान कच्ची (४२१ गुण)तिसरा, ओंकार महेंद्र रहाणे (४२० गुण) चौथा आणि वैदेही अनिल जंत्रे (४१८ गुण) हिने पाचवा क्रमांक मिळविला. प्राजक्‍ता कासार, नेहा पवार, सचिन गुंजाळ, विजय हासे आदी विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले आहे.

दिव्‍या देशात २६ वी

इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकच्‍या दिव्‍या बोरा हिने ६२२ गुण मिळवित राष्ट्रीय क्रमवारीत २६ वा क्रमांक पटकावला आहे. यासह राज चोरडिया (५८१ गुण), ध्रुव बेदमुथा (५६१ गुण), इशिता छाजेड (५६० गुण), आयुष निकम (५५१ गुण), अथर्व चव्‍हाणके (५३० गुण), यश लोढा (५३० गुण), जित राका (५२० गुण), सचिन कदम (५१६ गुण), परयुल जैन (५०४ गुण), स्‍नेहल चव्‍हाण (५०३ गुण) यांच्‍यासह अन्‍य विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

Yash Kulthe, Harshal Bhansali, Amena Kachchi, Divya Bora
PSI Success Story: इंजिनियर गायत्रीची पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी! अथक परिश्रमाला अखेर यश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com