लासलगाव- स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लासलगाव ग्रामपंचायतीने ओला आणि सुका कचरा संकलनासाठी पाच ई- बाईकची खरेदी केली आहे. या ई- बाईकचे लोकार्पण सरपंच योगिता पाटील आणि उपसरपंच रामनाथ शेजवळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते, ग्रामस्थ आणि कर्मचारी उपस्थित होते.