esakal | बस-टेम्पोच्या भीषण अपघातात 5 जखमी; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

tempo-bus highway

बस-टेम्पोचा भीषण अपघात; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर (mumbai-agra highway) बस-टेम्पोच्या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. (Five-injured-in-bus-tempo-accident-nashik-marathi-news)

वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर

महामार्गावर शहादावरून नाशिककडे निघालेली बस (एसएच १४, बीटी २३९) बोरस्ते शोरूमसमोर आली. त्याच वेळी विरुद्ध दिशेने टेम्पो (एमएच २०, २४४९) आला. दोन्ही वाहने भरधाव असल्याने वाहनचालकांना ताबा मिळविता आला नाही. (ता.७) दुपारी १ च्या दरम्यान टेम्पो व बसची समोरासमोर जबर धडक झाली. त्यात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात मुक्तार अली गुलाम अली सय्यद (रा. जळगाव), मिसार सुजाण खाटीक (दोघे रा. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. बसमधील तीन प्रवासी जखमी झाले. पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, प्रमोद देवरे, राकेश धोंगडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील संशयितांना न्यायालयीन कोठडी

हेही वाचा: कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

loading image