Nashik Accident News : सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental vehicles

Nashik Accident News : सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात घडला असून या अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Five people killed in horrific accident at Mohdari Ghat near Sinnar Nashik Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयामधील 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडर वरून पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या इनोवा व स्विफ्ट कारवर येऊन धडकली. मोहदरी घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास हा तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला.

हेही वाचा: Nashik Crime News : जानोरी शिवारातील गोदामावर छापा; 19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

यामुळे कारमधील हर्ष बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे, सायली पाटील व प्रतिक्षा घुले विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्त गाडी

अपघातग्रस्त गाडी

हेही वाचा: Chandrakant Patil News : 'भीक' शब्दावर चंद्राकांत पाटील ठाम; म्हणाले आत्ताचा सीएसआर…

टॅग्स :Nashik